घाटकोपर बेस्ट डेपोतील कंत्राटी कर्मचारी अचानक संपावर, नोकरदार मुंबईकरांचे हाल

188
घाटकोपर बेस्ट डेपोतील कंत्राटी कर्मचारी अचानक संपावर, नोकरदार मुंबईकरांचे हाल
घाटकोपर बेस्ट डेपोतील कंत्राटी कर्मचारी अचानक संपावर, नोकरदार मुंबईकरांचे हाल

मुंबईच्या घाटकोपर बेस्ट डेपोतील बेस्ट बस कंत्राटी कर्मचाऱ्यांनी बुधवारी सकाळी ९ वाजता पगारवाढ आणि बेस्टच्या सुविधा मिळत नसल्याचे आरोप करत अचानक संपावर गेले. हे सर्व कंत्राटी कर्मचारी आझाद मैदानात जमुन इतर सुविधा मिळाव्यात यासाठी आंदोलन करणार आहेत. दरम्यान, बेस्ट कर्मचाऱ्यांनी अचानक पुकारलेल्या संपामुळे नोकरदार मुंबईकरांचे मात्र हाल होणार आहेत.

पगार वाढ, सुविधा, ओव्हर टाईम अशा विविध मागण्यांबाबत बेस्ट घाटकोपर डेपो मधील कंत्राटी कर्मचारी मागणी करत होते. या मागण्यांसाठी प्रज्ञा खजुरकर या सहकुटुंब आझाद मैदानात उपोषणाला बसल्या आहेत. त्यांना समर्थन देण्यासाठी आणि आझाद मैदानात त्यांच्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी बेस्टच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनीही संप पुकारला आहे. मात्र, या संपाचा फटका सामान्य नागरिक, नोकरदार मुंबईकरांना बसणार आहे.

(हेही वाचा – जे जे रुग्णालयात अत्याधुनिक ऊर शल्यचिकित्सा विभाग सुरु)

या मागण्यांसाठी बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप

रेल्वे नंतर बेस्ट बस मुंबईकरांची दुसरी जीवनवाहिनी मानली जाते. दररोज शेकडोच्या संख्येने मुंबईकर चाकरमानी बेस्ट बसने प्रवास करतात. गेल्या काही महिन्यांपासून घाटकोपर बेस्ट बस कंत्राटी कर्मचारांच्या पगार वाढीची मागणी प्रलंबित आहे. त्यांना साधारणतः सध्या १६ हजार रुपये वेतन मिळत असून त्यांचे हे वेतन २५ हजार रुपयांपर्यंत वाढवावे अशी मागणी करत आहेत. त्याचबरोबर, पगारवाढीसोबतच इतरही बेस्टच्या सुविधा मिळाव्यात अशीही मागणी या कर्मचाऱ्यांनी केली होती. परंतू, अद्यापही त्यांच्या या मागण्या प्रलंबित राहिल्यामुळे या कर्मचाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेत अचानक संपावर जाण्याचा निर्णय घेतला.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.