बेस्ट आली धावून… अन् थेट बस रुग्णालयातच नेली!

69

बेस्ट बसला मुंबईकरांची जीवनवाहिनी म्हटले जाते. ही ओळख सार्थ ठरवणारी घटना नूकतीच घडली आहे. फिट आलेल्या लहान मुलाला तत्काळ रूग्णालयात नेल्याने अनर्थ टळला. मंगळवार २२ मार्च रोजी गोरेगाव ते नेहरू तारांगण या मार्गावरून धावणारी ३३ क्रमांकाची बस रात्री एकच्या सूमारास सिटीलाईट बस थांब्यावरून जात असताना सिग्नलजवळ पुजा पारकर नावाची महिला मदतीसाठी आरडाओरड करत होती. त्या महिलेच्या मुलाला फिट आल्याने त्याच्यावर लगेच उपचाराची गरज होती. बसचे चालक-वाहक यांनी गांभीर्य ओळखून त्याच बसमधून मुलाला रूग्णालयात दाखल केले.

( हेही वाचा : बेस्ट कर्मचाऱ्यांच्या पुढील वाटचालीवर होणार निर्णय )

बेस्ट कर्मचाऱ्यांनी केली उपचारासाठी मदत

पुजा पारकर यांचा पाच वर्षांचा मुलगा शिवम पारकर याला फिट येऊन त्याची दातखिळी बसली. त्यावेळी त्या मदतीसाठी आरडाओरड करत होत्या. हे येथून जाणाऱ्या सहाय्यक वाहतूक अधिकारी राजेश विचारे यांनी बस वाहक आप्पासाहेब लोहार आणि बसचालक किशोर दाणे यांच्या लक्षात आणून दिले. प्रसंगाचे गांभीर्य ओळखून बस ठाकूर हॉस्पिटल येथे नेण्याचे आदेश दिले. त्यानुसार चालक वाहक लोहार आणि दाणे यांनी तातडीने बस ठाकूर हॉस्पिटलला नेऊन शिवम पारकर याला रूग्णालयात दाखल केले. बेस्ट कर्मचाऱ्यांच्या मदतीमुळे शिवम पारकर याला वेळेत उपचार मिळाले.

2 3

बेस्ट कर्मचाऱ्यांनी दाखवलेल्या प्रसंगावधानाची दखल बेस्टचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्र यांनी घेतली आणि बस वाहक आप्पासाहेब लोहार आणि किशोर दाणे यांचा कार्यालयात बोलावून सत्कार केला.

1 3

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.