मुंबईमध्ये लोकल रेल्वेनंतर बेस्ट बस (BEST Bus) या सार्वजनिक वाहतूक सेवेकडे पाहिलं जातं. मुंबईत एका बेस्ट बस ड्रायव्हरने बस थांब्यावर बस न थांबवल्याने तिघांनी चालकावर हल्ला केल्याचं समोर आलं आहे. ही घटना वांद्रे पूर्व (Bandra East) भागातील आहे. एसी बस, बस स्टॉप वर न थांबवल्याने 52 वर्षीय बेस्ट बस चालक बळवंत खानविलकर यांच्यावर हल्ला करण्यात आल्याची घटना घडली होती. संबंधित आरोपीला पोलिसांकडून अटक करण्यात आले आहे. (Best Bus Driver)
(हेही वाचा – Bajrang Punia : बजरंग पुनियावरील बंदी नाडाने पुन्हा केली लागू)
वांद्रे पूर्वेतील शास्त्रीनगर येथे राहणारे बेस्ट बस ड्रायव्हर बळवंत खानविलकर धारावी डेपोत ड्युटीला आहेत. हल्ल्यामध्ये बळवंत खानविलकर यांना चेहऱ्यावर आणि डोक्यावर गंभीर दुखापत झाली आहे असून, त्यांच्यावर सायन येथील पालिका रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी संध्याकाळी साडेसात वाजता वांद्रे येथील कलानगर बस स्टॉपवर C-72 (Best Bus C-72) क्रमांकाची बस प्रवाशांनी तुडुंब भरलेली असल्यानं ड्रायव्हरनं थांबवली नाही. (Best Bus Driver)
(हेही वाचा – Meta AI : मेटा कंपनीच्या फेसबुक, इन्स्टाग्राम, मेसेंजरसाठी आता एआय प्रोग्रामची मदत)
पुढे काही अंतरावर जाऊन सिग्नलवर बस थांबली असता तीन प्रवाशांनी बसच्या दिशेनं धाव घेतली आणि ड्रायव्हर सोबत हुज्जत घालण्यास सुरुवात केली. वाद वाढल्यानंतर एकानं बसचा व्हायपर तोडून बसचं नुकसान केलं. मग इतर दोघांनी थेट बस ड्रायव्हरला मारहाण करण्यास सुरुवात केली. या हाणामारीतल बस ड्रायव्हरच्या चेहऱ्याला आणि डोक्याला जबर मार बसला. खेरवाडी पोलिसांनी (Kherwadi Police Station) याप्रकरणी तक्रार दाखल करुन घेत ३० वर्षीय गोरक्ष सोनावणे नावाच्या आरोपीला अटक केली आहे. तर इतर दोघांवर कलम ३३२, ३५३, ५०४, ५०६, ४२७ अंतर्गत गुन्ह्याची नोंद केली आहे. तसेच “आम्ही सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून इतर दोन आरोपींची ओळख पटवण्याचे प्रयत्न करत आहोत.”, असं पोलीस अधिकारी राजेंद्र मुळीक (Rajendra Mulik) यांनी सांगितलं. (Best Bus Driver)
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community