‘बेस्ट’ गिफ्ट! संपूर्ण मुंबईत सुरू होणार ई-बाईक सेवा; बस थांब्यांवरून प्रति किमी फक्त ३ रुपये भाडे

101

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी असून मुंबईत लवकरच ई-बाईक सेवा सुरू होणार असल्याची घोषणा बेस्टने केली आहे. यामुळे आता बसमधून उतरणारे प्रवासी त्यांच्या इच्छितस्थळी जाण्यासाठी ई-बाईक सेवेचा वापर करू शकतात. ऑक्टोबरपासून १८० बस थांब्यांवर व्यावसायिक तसेच निवासी भागात १ हजार ई-बाईत तैनात करण्यात येणार असल्याची माहिती बेस्ट उपक्रमाने दिली आहे. सध्या अंधेरीमधील बस थांब्यांवर ही सेवा प्रायोगिक तत्वावर सुरू असून उपक्रमाचा हा प्रयोग यशस्वी झाल्यामुळे बेस्टने या दुचाकी सेवेचा विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे.

( हेही वाचा : T20 WorldCup : बुमराहच्या जागी भारतीय संघात ‘या’ गोलंदाजाचा समावेश! BCCI ने ट्विटरवर नाव केले जाहीर)

आता पुढील टप्प्यांमध्ये ही सेवा मुंबईतील अंधेरी, विलेपार्ले, जुहू, सांताक्रूझ, खार, वांद्रे, माहिम आणि दादर येथे सुरू होतील अशी माहिती बेस्टकडून देण्यात आली आहे. जून २०२३ पर्यंत ५ हजार ई-बाईक सेवेत आणण्याचे बेस्टने ठरवले आहे. लवकरच ही सेवा बेस्टच्या चलो अ‍ॅपसोबत संलग्न केली जाणार आहे.

भाडेदर कसे असतील

या इलेक्ट्रिक दुचाकी बेस्ट थांब्याच्या बाजूलाच उभ्या करण्यासाठी परवानगी देण्यात येणार आहे. या दुचाकीचा वेग प्रतितास २५ किलोमीटर इतका असले. प्रति तीन किलोमीटर प्रवास आणि मूळ भाडे २० रुपये असेल आणि त्यापुढील प्रवासासाठी दीड रुपये प्रति मिनिट आकारले जातील.

ई-बाईकसाठी लायसन्स गरजेचे नाही

बेस्ट उपक्रमाने वोगो कंपनीच्या ई-बाईक सेवेत आणल्या आहेत. या बाईकची गती कमी असल्याने याला चालवण्यासाठी चालक परवान्याची आवश्यकता नाही. यामुळे या बाईकचा लाभ सर्वसामान्यांना सुद्धा घेता येणार आहे. ही बाईक गिअरलेस असणार आहे. चलो अ‍ॅपत्या माध्यमातून तुम्ही ही बाईक भाड्याने घेऊ शकता. यासाठी तुम्हाला ऑनलाईन या ई-बाईकचे भाडे भरावे लागेल. बेस्ट थांब्यांवर ई-बाईक सेवेचा बेस्ट बस पास आणि सुपर सेव्हर योजनेचे वापरकर्तेही दुचाकी वापरू शकतात. यामुळे बस थांब्यावर उतरून प्रवाशांना खासगी वाहनांची वाट न पाहता या दुचाकीने आपल्या इच्छितस्थळी पोहोचता येईल. ऑफिस जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना या सुविधेचा मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. अंधेरीमध्ये ४० ठिकाणी वीजेवर धावणाऱ्या १८० दुचाकी उपलब्ध करण्यात आल्या असून दररोज जवळपास २०० प्रवासी या दुचाकी सेवेचा लाभ घेतात.

सध्या सुरू असणारी सेवा

  • अंधेरी पूर्व डायनेस्टी बिझनेस पार्क.
  • जेबी नगर मेट्रो स्टेशन.
  • आकृती स्टार.
  • चकाला औद्योगिक क्षेत्र.
  • टेक्नोपोलिस नॉलेज पार्क.
  • आगरकर चौक बसस्टॉप.
  • सहार रोड
  • रेल्वे कॉलनी

या मार्गावर भविष्यात उपलब्ध होणार दुचाकी सेवा

  • वांद्रे- कुर्ला संकुल ( BKC)
  • दक्षिण मुंबई
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.