मुंबईतील बेस्ट बस (BEST Bus) भंगार विक्रीत तथाकथित गैरव्यवहार झाल्याप्रकरणी उच्चस्तरीय चौकशी करण्यात येईल, असे आश्वासन राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी मंगळवारी ९ जुलैला विधानसभेत दिले.
चौकशीची मागणी
बेस्टच्या भंगार विक्रीत गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत श्रीरामपूरचे आमदार लहू कानडे यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित केला. त्याला भाजपाचे आमदार आशिष शेलार यांनी पाठिंबा देत याप्रकरणी चौकशी करण्याची मागणी केली, ती उद्योगमंत्र्यांनी मान्य करत चौकशीचे आश्वासन दिले.
भंगार विक्रीबाबतची कागदपत्रे गहाळ?
कानडे यांनी बेस्टच्या भंगार बस विक्रीच्या आकडेवारीत मोठ्या प्रमाणात तफावत दिसून येत असून यात कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचे नुकतेच निदर्शनास आले, हे खरे आहे काय? असा प्रश्न केला. तसेच, बेस्ट प्रशासनाकडे सन १९७१ ते २००७ या कालावधीतील भंगार विक्रीबाबतची कागदपत्रे उपलब्ध नसल्याचे ५ जानेवारी, २०२४ रोजी किंवा त्यासुमारास निदर्शनास आले आहे, गैरव्यवहार लपविण्यासाठी उक्त कागदपत्रे जाणूनबुजून गहाळ करण्यात आल्याने या प्रकरणी शासनाने चौकशी करुन यातील दोषींविरुध्द कोणती कारवाई करावी, अशी मागणी कानडे यांनी केली.
(हेही वाचा – Jammu and Kashmirमध्ये लष्कराच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला; ५ जवान हुतात्मा, ६ जखमी)
गैरव्यवहार नाही
त्यावर सामंत यांनी (Uday Samant) अगोदर हे खरे नाही, असे उत्तर दिले. तसेच बेस्टच्या भंगार बस विक्रीची सन १९७१ ते २००७ पर्यंतची कागदपत्रे (रेकॉर्ड) बेस्ट उपक्रमाकडे उपलब्ध आहेत आणि भंगार बस विक्रीच्या आकडेवारीत कोणत्याही प्रकारची तफावत नसून कोणताही गैरव्यवहार झालेला आढळून आला नाही, असेही स्पष्ट केले. (BEST Bus)
ठराविक कंत्राटदारच भंगार विक्रीत सहभागी
यावर आक्षेप घेत शेलार यांनी ठराविक कंत्राटदारच या भंगार विक्रीत सहभागी होत असल्याकडे लक्ष वेधले असता सामंत यांनी उच्चस्तरीय चौकशीचे आश्वासन दिले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community