- विशेष प्रतिनिधी, मुंबई
कुर्ला येथील बेस्ट बस (Best Bus) अपघातानंतर बेस्टमधील चालकांच्या प्रशिक्षणाबाबतचा प्रश्न ऐरणीवर आला असून ज्याप्रमाणे बेस्टमधील कायम चालकांना प्रशिक्षण देण्यात येते, त्याचप्रमाणे कंत्राटी चालकांना मुंबईतील रस्त्यांवर बस चालवण्याचे कोणतेही प्रशिक्षण दिले जात नाही. त्यामुळे खासगी कंत्राटी कंपनीच्या चालकांकडून प्रवाशांची काळजी घेत वाहन चालण्याऐवजी वेळेत फेऱ्या पूर्ण करण्यासाठी बेदरकारपणे बस चालवण्याचे प्रकार घडत असतात. त्यातूनच कुर्ला सारखे अपघाताचे प्रकार बेस्ट बसमुळे घडत असल्याचे समोर येत आहेत.
बेस्ट बस (Best Bus) अपघातानंतर खासगी चालकांमार्फत चालवल्या जाणाऱ्या बेस्ट बस बाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. खासगी बस चालकांना, प्रवाशांशी कशाप्रकारे वर्तन करावे, बस मार्गावर अशी बस चालवावी, कुठल्या बस आगारांमध्ये कुठे आणि बस स्थानकांवर कशाप्रकारे कुठे थांबवली जावी, प्रवाशी असताना कशी आणि किती वेगाने बस चालवली जावी याबाबतचे प्रशिक्षण दिले जाते. परंतु बेस्टच्या माध्यमातून खासगी संस्थांची नेमणूक करून बस चालवल्या जात आहे, त्या बसच्या चालकांना कोणत्याही प्रकारचे प्रशिक्षण दिले जात नाही. एवढेच काय तर आगारातून बस बाहेर काढताना त्याचे ब्रेक आणि बसच्या स्थितीची तपासणी करून बस रस्त्यावर काढले जात नाही. त्यामुळे कुर्ल्यातील बस अपघात याच कारणांमुळे झाल्याचे बोलले जात आहे.
(हेही वाचा – Assembly Session : आमदारांच्या बोलण्यावर चाप लावावा!)
बेस्ट समितीचे माजी सदस्य आणि भाजपाचे पदाधिकारी सुनील गणाचार्य यांनी याबाबत बोलतांना, बेस्टच्या कायम बस चालकांना १५ दिवसांचे दिंडोशी आगारातून बस चालवण्याचे प्रशिक्षण दिले जाते. तसेच बस चालण्याची प्रशिक्षण पूर्ण होत आहे, चालकाला जोवर विश्वास वाटत नाही तोवर त्याच्या हाती बस दिली जात नाही. तसेच प्रथमच बस हाती दिल्यानंतर त्यांना बस मार्गाची माहिती स्वत: बस निरिक्षक आतमध्ये बसून माहिती करून देत असे. ज्यामुळे बस स्टॉपच्या कुठे बसला ब्रेक मारली म्हणजे कुठे थांबली जाईल आणि प्रवाशांना बसमध्ये चढता येईल याची माहिती दिली जायची.
परंतु खासगी कंपनीकडून ज्यांच्याकडे बस चालण्याचे बॅच आहेत, किंवा परवाना आहे, त्यांच्याकडून बेस्टची बस (Best Bus) चालवून घेत त्याचा व्हिडीओ बेस्टच्या अधिकाराला पाठवून त्याची नियुक्ती केली जाते. त्यामुळे अशाप्रकारच्या प्रशिक्षणामुळे चालकाच्या हाती प्रवाशांनी भरलेली बस देणे हेच धोक्याचे आहे. खासगी कंपनीने दिलेल्या व्हिडीओच्या आधारे चालकाची नियुक्ती केली जाते, पण बेस्टचे अधिकारी त्या चालकाची टेस्ट घेत नाही, उलट कंपनीने सादर केलेल्या चालकाच्या शिफारशीला मान्यता देत त्यांची नियुक्ती केली जाते. त्यामुळे बस चालकाकडून वाहतुकीचे नियम पाळले जात नसल्याने असे प्रकार दिसून येत आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community