- विशेष प्रतिनिधी, मुंबई
बेस्ट उपक्रमात बसेसचे खासगी करण करण्यात आल्यानंतर आता खासगी कंपनीच्या माध्यमातून चालकासह बसेस चालवल्या जात आहे. मात्र, बेस्टच्या बस चालकांचे ज्याप्रमाणे प्रवाशांशी एकप्रकारे ऋणानुबंध होते, तसे नाते खासगी कंपनीच्या बस चालकांमध्ये दिसून येत नसून याचे नाते प्रवाशांशी नसून चालकांचे नाते किलोमीटरशी असल्याचे दिसून येत आहे. दिवसभरात नेमून दिलेल्या फेऱ्या आणि त्याअंतर्गत कापले जाणारे किलोमीटर याचेच टार्गेट कंपनीने चालकांना दिल्यामुळे बऱ्याच वेळा बस स्टॉपवरही चालक बस उभी न करता भरघाव वेगाने घेऊन जात असतात. (Best Bus)
याला बेस्ट प्रशासनच जबाबदार
कुर्ला येथील बेस्ट बस अपघातानंतर खासगी कंपनीला दिलेले कंत्राट रद्द करून बेस्ट प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून बसेस चालवण्याची मागणी केली जात आहे. मात्र, कुर्ला येथील घटनेनंतर प्रशासनाने अद्यापही बेस्टने याची जबाबदारी स्वीकारलेली नसून ना कंत्राटदारावर कारवाईची नोटीस बजावली ना याबाबत कोणत्याही प्रकारचे विधान केले. याबाबत बेस्ट समितीचे माजी विरोधी रवी राजा यांना प्रतिक्रिया विचारली असता ते म्हणाले की, या बस सेवांचे कंत्राट बेस्ट उपक्रमाने दिलेले असून या कंत्राटावरील बसचा अपघात झाला असला तरी याला बेस्ट प्रशासनच जबाबदार आहे. त्यामुळे बेस्ट उपक्रमाने या अपघाताची नैतिक जबाबदारी स्विकारुन पुढील कार्यवाही करायला हवी असे म्हटले आहे. (Best Bus)
(हेही वाचा – ज्येष्ठ वकील Ujjwal Nikam यांनी विरोधकांना सुनावले खडेबोल; पराभवाचे भांडवल…)
छोटे वाहन, टेम्पो चालवणाऱ्या चालकाच्या हाती बस
बेस्टच्या जुन्या बसेसमध्ये ४० किलोमीटर वेगापेक्षा अधिक वेगाने बस चालवली जाऊ नये अशाप्रकारे वेगावर नियंत्रण असायचे आहे, परंतु या सर्व आता इलेक्ट्रिक बसेस असून त्या बसेसमध्ये अशाप्रकारे स्पीड लॉक केले किंवा नाही असे कुठेच ऐकिवात नाही. त्यामुळे तसे नसेल तर ही सर्वांत धोक्याची बाब आहे. मुळात बेस्टच्या सेवेत दाखल होणाऱ्या चालकांसह वाहकांना प्रशिक्षण दिले जाते. दोन महिने प्रशिक्षण दिले जाते, पण इथे खासगी बस चालकांना दोन दिवसही प्रशिक्षण दिले जात नाही. एखादे शिकावू चालकाला वाहतूक विभाग परवाना देताना किमान तीन महिने वाहन शिकले पाहिजे अशाप्रकारची अट घालते, तर इथे प्रवाशांसह भरलेली बस कोणतेही छोटे वाहन, टेम्पो चालवणाऱ्या चालकाच्या हाती दिले जाते. त्यामुळे या चालकांकडून जे वाहन चालवले जाते, त्याचे त्याचा त्याला अनुभव असेल, पण त्यांच्या हाती जेव्ही इलेक्ट्रीक व्हेहीकल दिले जाते, त्याचे त्याला प्रॉपर प्रशिक्षण दिल्याशिवाय त्यांचा हात त्यावर बसल्याशिवाय त्याची नियुक्ती करणे हेच मुळी चुकीच आहे. (Best Bus)
खासगी संस्थेचा केवळ मीटर टाकण्याचाच प्रयत्न
अशाप्रकारची वाहने बेस्टने खरेदी केल्यानंतर उत्पादीत कंपन्यांकडून चालकांना प्रशिक्षण दिले जायचे, तसेच त्यांची तांत्रिक माहितीही दिली जायची. संबंधित उत्पादित कंपनीकडून योग्य ती माहिती ही चालकांसह, वाहक आणि तांत्रिक कर्मचाऱ्यांनाही दिली जायची. परंतु आधीच बसेस जास्त उभ्या असल्याने त्यासाठी चालक नेमून आपली वाहने आणायची आणि आपला मीटर टाकायला लावायचा असाच प्रकार खासगी कंपनींकडून होत आहे, असाही आरोप राजा यांनी केला. (Best Bus)
(हेही वाचा – Fake Bomb Call: चाळीसगाव रेल्वे स्थानकावर खोट्या बॉम्बच्या धमकीचा संदेश; आरोपीला दोन तासांत अटक)
दिवसभराच्या किलोमीटरचे टार्गेट प्रत्येक चालकाला
आज या संस्थांना दिवसभरातील किलोमीटरच्या दराने बसेसची सेवा घेतली जात आहे. त्यामुळे जेवढे जास्त किलोमीटर गाडी पळेल तेवढा मीटर जास्त पडेल. त्यामुळे जास्त मिटर वाढवण्याच्या दृष्टीकोनातून बेस्टमधील खासगी बसचे चालक हे प्रवाशांऐवजी किलोमीटरला अधिक प्राधान्य देत आहे. दिवसभराच्या किलोमीटरचे टार्गेट प्रत्येक चालकाला दिले जाते, त्यामुळे आठ तासांच्या सेवामध्ये हे टार्गेट न झाल्यास संबंधित चालकांना कधी नऊ, तर कधी दहा आणि तर बारा बारा तास सेवा करावी लागते. मुंबईतील अनेक रस्ते हे खोदलेले किंवा वाहतूक कोंडी यामुळे या खासगी बसेसचे किलोमीटरचे टार्गेट पूर्ण होत नाही. त्यामुळे खासगी बसेसच्या चालकांना अधिक सेवा बजावावी लागते, त्यातुलनेत बेस्टच्या कायम कर्मचाऱ्यांना दिलेल्या वेळेपेक्षा अधिक सेवा दिली जात नाही आणि दिलीच तर कामगार संघटना आवाज उठवतात, असे त्यांनी स्पष्ट केले. (Best Bus)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community