बेस्टचे नवे मार्ग! मेट्रोने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दिलासा

125

मुंबई शहराच्या पश्चिम उपनगरामध्ये कार्यरत असलेल्या मेट्रो-२ ए आणि मेट्रो-७ या मेट्रोसेवांचा आता दहिसर (पूर्व) ते डी. एन. नगर अंधेरी (प.) पर्यंत विस्तारीत करण्यात येत आहे. तसेच मेट्रो-७ या सेवेचा – विस्तार गुंदवली- अंधेरी (पूर्व) पर्यंत करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर आतास्थानकांदरम्यान सद्यस्थितीत उपलब्ध असलेल्या बेस्ट उपक्रमाच्या बससेवांव्यतिरिक्त काही नवीन बसमार्ग दिनांक २० जानेवारी २०२३ पासून सुरु करण्यात येत आहेत. या बसमार्गांद्वारे मेट्रोरेलने प्रवास करणा-या प्रवाशांना अतिरिक्त बससेवा उपलब्ध होईल. या नवीन बसमार्गाचा तपशील पुढीलप्रमाणे आहे-

(अ) मेट्रो-२. ए :-

बसमार्ग क्र. ए-२९५ – हा बसमार्ग शांती आश्रम आणि चारकोप दरम्यान एक्सर, बोरीवली मेट्रोरेल स्थानक, गोराई आगार, चारकोप पहाडी एक्सर मेट्रोरेल स्थानक मार्गे वर्तुळाकार सेवेत प्रवर्तित होईल.

पहिली बस – सकाळी ७ वाजता
शेवटची बस – रात्री २२.३० वाजता

(ब) मेट्रो – ७ :-

बसमार्ग क्र. ए- २८३ – हा बसमार्ग दिंडोशी बसस्थानक येथून मेट्रो ७ वरील दिंडोशी, कुरार, आकुर्ली मेट्रोरेल स्थानक मार्गे दामूनगर (विस्तारीत) पर्यंत प्रवर्तित होईल.

दिंडोशी बसस्थानक – सकाळी ६.३० वाजता पहिल बस, शेवटची बस रात्री २२.०० वाजता

दामूनगर (विस्तारीत) – पहिली बस सकाळी ७.०० वाजता आणि शेवटची बस रात्री २२.३० वाजता

(क) मेट्रो-२ ए व मेट्रो – ७ :- बसमार्ग क्र.ए.-२१६ – हा बसमार्ग एन.एल. कॉम्प्लेक्स / सरस्वती संकुल येथून मेट्रो-२ ए व मेट्रो-७ च्या दहिसर (पूर्व) मेट्रोरेल स्थानक मार्गे मेट्रो-७ च्या ओवरीपाडा, राष्ट्रीय उद्यान मेट्रोरेल स्थानक मार्गे बोरीवली स्थानक (पूर्व) पर्यत प्रवर्तित होईल.

मुंबई शहराच्या पश्चिम उपनगरातील दहिसर (पूर्व) येथून डी. एन. नगर अंधेरी (प) आणि गुंदवली. अंधेरी (पूर्व) दरम्यान अनुक्रमे प्रवर्तित होणा-या मेट्रो-२-ए आणि मेट्रो-७ या मेट्रोरेल सेवांचा लाभ घेऊ इच्छिणा-या सर्व प्रवाशांनी या बससेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन बेस्ट उपक्रमाकडून करण्यात आले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.