बेस्टच्या ताफ्यात दाखल होणार तब्बल २ हजार नव्या गाड्या; प्रवास होईल सुकर

107

येत्या काही महिन्यांमध्ये मुंबईकरांच्या सेवेत २ हजार बसगाड्या दाखल होणार आहेत. मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरणाच्या बैठकीत नव्या बसगाड्यांच्या परवान्याला मंजुरी देण्यात आली. दोन हजार बसगाड्या सेवेत दाखल करण्यासाठी बेस्ट उपक्रमाकडून नियोजन करण्यात येणार आहे.

( हेही वाचा : बेस्ट बसमध्ये वस्तू विसरलात? आता भरावे लागणार १४ टक्के शुल्क )

२ हजार नव्या गाड्यांमुळे प्रवाशांचा प्रवास होणार सुकर 

सध्या मुंबईकरांना ३ हजार ६७९ हून अधिक बसगाड्या सेवा देत आहेत. उपक्रमाने येत्या काही वर्षांत बेस्टच्या ताफ्यातील बसगाड्यांची संख्या १० हजारांपर्यंत वाढवण्याचे उद्दिष्ट केले आहे. नव्या दोन हजार गाड्या बेस्टच्य ताफ्यात आल्यास प्रवशांचा प्रवास सुकर होईल. निविदा आणि अन्य कामांची प्रक्रियाही लवकरच उपक्रमाकडून राबवण्यात येणार आहे.

फुकट्या प्रवाशांवर कारवाई 

दरम्यान, बेस्टकडून ५ किलोमीटरसाठी ५ रुपये तिकीट दर आकारले जाते परंतु तरीही काही प्रवासी विनातिकीट प्रवास करू लागले आहेत. या फुकट्या प्रवाशांमुळे बेस्टच्या उत्पन्नावर परिणाम होत आहे. बेस्टने २०१९ पासून आतापर्यंत बसमधून विनातिकीट प्रवास करणाऱ्या तब्बल १ लाख १३ हजार २७९ फुकट्या प्रवाशांवर कारवाई करून त्यांच्याकडून ७८ लाख ४४ हजार ६५० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.