बेस्टला लाखोंचा फायदा! ३१ डिसेंबरच्या विशेष फेऱ्यांना मुंबईकरांची पसंती

मुंबईकर प्रवाशांसाठी बेस्टने ३१ डिसेंबरला अतिरिक्त गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला होता. नववर्षाचे स्वागत करण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने गर्दी करतात. अशावेळी प्रवाशांची गैरसोय होऊ नये याकरता या विशेष गाड्यांचे नियोजन उपक्रमामार्फत करण्यात आले होते. डिसेंबरच्या मध्यरात्री ते पहाटेपर्यंत मुंबई दर्शनासाठी दुमजली खुली बस चालवण्यात आली. या सेवेतून २ लाख ३९ हजार ९५० रुपयांचा महसूल मिळाल्याची माहिती बेस्ट उपक्रमाने दिली आहे.

( हेही वाचा : आरामदायी प्रवासासाठी एसटीच्या ताफ्यात येणार स्लीपर बस! )

दुमजली बसचा मार्ग 

सध्या बेस्टची खुली दुमजली बस पर्यटकांना गेट वे ऑफ इंडिया, प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम, मंत्रालय, विधानभवन, एन.सी.पी.ए, मरिन ड्राईव्ह, गिरगाव चौपाटी, चर्चगेट स्थानक, ओव्हल मैदान, मुंबई उच्च न्यायालय, मुंबई विद्यापीठ, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई महानगरपालिका मुख्यालय, हुतात्मा चौक, हॉनिर्मन सर्कल, रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडिया, एशियाटिक लायब्ररी, जुने कस्टम हाऊसचे दर्शन घडवते.

पर्यटकांसाठी बेस्ट सेवा 

प्रवाशांच्या मागणीनुसार ३१ डिसेंबरच्या मध्यरात्री १२ ते रविवारी पहाटे सव्वा पाच वाजेपर्यंत ही सेवा देण्यात आली. तसेच बेस्टकडून चौपाटी मार्गावर काही अतिरिक्त ५० बसगाड्या सोडण्यात आल्या होत्या.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here