अमृत महोत्सवानिमित्त प्रवाशांसाठी ‘बेस्ट’ सवलती

154

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व बेस्टच्या महापालिकाकरणाचा अमृत महोत्सवाचा एक भाग म्हणून बेस्टची एक रुपयांत पाच प्रवासांचा ‘बेस्ट आजादी’ योजना स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने बेस्टच्या महापालिकाकरणाच्या अमृत महोत्सवी वर्षात बेस्ट उपक्रमाने फक्त एका रुपयांत बेस्ट आजादी योजना जाहीर केली आहे. या योजनेअंतर्गत चलो अ‍ॅपचा पहिल्यांदा वापर करणाऱ्या नव्या प्रवाशांना सात दिवसांचा बसपास केवळ एक रुपयांत डाऊनलोड करता येईल. ज्यामध्ये त्यांना वातानुकूलित किंवा विना वातानुकूलित बसमध्ये सात दिवसांत कितीही अंतराच्या पाच फेऱ्यांचा लाभ घेता येईल. सदर सवलत दिनांक १५ ऑगस्ट २०२२ पर्यंत लागू राहील.

( हेही वाचा : बेस्टचे बंद केलेले बसमार्ग पुन्हा सुरु होणार?)

२२ लाख प्रवासी चलो अ‍ॅपचा वापर करतात

बेस्टच्या डिजिटायझेशनचा भाग म्हणून काही महिन्यापूर्वीच बेस्ट उपक्रमामध्ये डिजिटल तिकीट प्रणाली सुरु करण्यात आली होती. या डिजिटल तिकीट प्रणाली अंतर्गत प्रवाशांना तिकीट आणि बसपास खरेदी करिता मोबाईल तिकिटिंग अ‍ॅप ‘बेस्ट चलो अ‍ॅप आणि बेस्ट चलो एनसीएमसी कार्डचा प्रारंभ करण्यात आला होता. सध्याच्या 33 लाख दैनंदिन प्रवाशांपैकी २२ लाख प्रवासी चलो अ‍ॅपचा वापर करतात आणि ३.५ लाख प्रवासी डिजिटल तिकीट प्रणालीचा वापर करतात. भारतामध्ये बेस्ट ही एकमेव परिवहन सेवा आहे, जेथे प्रवाशांसाठी एनसीएमसी कार्ड उपयोगांत आणले आहे.

स्मार्ट कार्डवर २० रुपयांची सवलत

डिजिटल पेमेंटला चालना देण्याच्या उद्देशाने बेस्ट आजादी बसपास योजना घोषित करण्यात आली आहे. मुंबईकर, विशेषतः नव्याने अ‍ॅपचा वापर करणाऱ्यांना या नवीन योजनेचा फायदा होणार असून त्याद्वारे बेस्ट बसमधील डिजिटल प्रणालीचा वापर वाढणार आहे. हा बेस्ट बसमधील तिकीट खरेदी करण्याचा अतिशय सुलभ मार्ग आहे. मुंबईकरांना जागतिक डिजिटल तिकीट प्रणालीचा अनुभव देणे ही, या पास योजनेमागील कल्पना आहे. डिजिटल बस योजनेला देखील सध्या वाढती मागणी आहे. बेस्टचा १०० हून अधिक डिजिटल बसेस मध्ये टॅप इन आणि टॅप आउट प्रणाली कार्यान्वित आहे. आता तिकिटांसाठी रांगेत उभे राहावे लागत नसल्याने प्रवाश्यांना प्रवास करणे सोयीचे झाले आहे. तसेच ज्या लोकांना स्मार्ट कार्डस / एनसीएमसी कार्डचा वापर करावयाचा असेल अशा प्रवाशांना २०/- रु. ची सवलत ‘दिली जाते. ही सवलत देखील दिनांक १५ ऑगस्ट २०२२ पर्यंत लागू राहणार आहे. तरी सदर योजनेचा लाभ जास्तीत जास्त मुंबईकर प्रवाशांनी घ्यावा असे बेस्ट उपक्रमाद्वारे आवाहन करण्यात येत आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.