‘बेस्ट’ची नाईट शिफ्ट बंद! आता रात्रीचा प्रवास करणाऱ्यांच्या खिशाला बसणार कात्री

137

आता मुंबईत रात्रीचा प्रवास करणाऱ्यांच्या खिशाला चांगलीच कात्री बसणार आहे. कारण, मुंबईतील अत्यंत महत्त्वपूर्ण आणि सुरक्षित प्रवासासाठी फायदेशीर ठरणारी रात्री १२ ते सकाळी ४ पर्यंतची बेस्ट बस सेवा आता बंद करण्यात येणार आहे. प्रवाशांचा अल्प प्रतिसाद मिळत असल्याने ही सेवा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे बेस्ट प्रशासनाकडून सांगण्यात आले.

( हेही वाचा : मरिन ड्राईव्हच्या ‘त्या’ जुन्या जेटीच्या जागेवर उभारणार ‘सी -साईड प्लाझा’)

प्रवाशांना बसणार आर्थिक भुर्दंड 

मुंबईकरांची पहिली लाईफलाईन रेल्वेनंतर बेस्टमध्ये सर्वाधिक गर्दी असते. तीन शिफ्टमध्ये काम करणाऱ्यांना कर्मचाऱ्यांना ही बेस्ट सेवा अत्यंत उपयुक्त ठरत होती. तसेच रात्री फिरणाऱ्या पर्यटकांनाही ही सेवा सोयीची ठरायची. परंतु आता ही सेवा बंद झाल्याने प्रवाशांना आर्थिक भुर्दंड बसणार आहे कारण, रात्री उशिरा टॅक्सी, रिक्षाचालकांकडून भरमसाट दर आकारले जातात.

गेल्या काही काळात बसेसची घटलेली संख्या आणि रात्र पाळीच्या बसेसमध्ये घटलेल्या प्रवासी संख्येच्या पार्श्वभूमीवर रात्रीची बससेवा तात्पुरती बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.