मुंबईकरांसाठी गणेशोत्सवानिमित्त ‘बेस्ट’ ऑफर; फक्त २० रुपयांत ५० फेऱ्या

157

मुंबई ३० गणेश चतुर्थीच्या पूर्व संध्येला बेस्ट उपक्रमाने मुंबईकर जनतेसाठी एक आकर्षक योजना जाहीर केली आहे. यामध्ये बेस्ट चलो अ‍ॅप वापरणाऱ्या प्रवाशांना ७९९ रुपयांचा सुपर सेवर प्लॅन केवळ १९९ रुपयांना उपलब्ध होणार आहे म्हणजेच प्रवाशांना ७५% सवलत मिळणार आहे. सदर योजना १४ दिवसांकरिता वैध राहणार असून यामध्ये २० रुपयांच्या ५० फेऱ्यांचा समावेश असणार आहे. जास्तीत जास्त मुंबईकरांना डिजीटल तिकीट प्रणालीकडे आकर्षित करण्याच्या दृष्टीकोनातून सदर योजना तयार करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ बेस्ट चलो अ‍ॅप वापरणारे विद्यमान प्रवासी तसेच नवीन प्रवासी या दोघांनाही मिळणार आहे.

( हेही वाचा : बेस्ट युनियनची सभासद नोंदणी ऑनलाईन स्वरूपात होणार; कालावधी १५ दिवस पुढे )

योजनेचा लाभ कसा घ्याल ?

गुगल प्ले स्टोअर मधून चलो अॅप डाऊनलोड केल्यानंतर बसपास सेक्शनमध्ये जाऊन सदर योजना शोधावी. गणेशोत्सव योजना निवडून प्रवाशांनी त्यांचा तपशील भरुन त्यांचा फोटो अपलोड करावा. डेबिट किंवा क्रेडिट कार्डद्वारे तसेच नेट बँकिंग किंवा युप आयद्वारे १९९ रुपयाचे ऑनलाईन रिचार्ज करून प्लान खरेदी करावा. बसमध्ये चढल्यावर ‘Start a Trip’ वर क्लिक करुन तुमचा मोबाईल फोन बसवाहकाच्या तिकीट यंत्राजवळ वैधतेसाठी धरावा. वैधता पूर्ण झाल्यावर प्रवासाकरिता डिजिटल पावती उपलब्ध होईल. हो संपूर्ण प्रक्रिया कॅशलेस आणि पेपरलेस असणार आहे.

योजनेपासून मिळणारे लाभ

सदर योजनेत सहभागी झालेल्या प्रवाशांना १४ दिवसांच्या कालावधीमध्ये ५० फे-यांचा लाभ मिळणार आहे. वातानुकूलित तसेच बिगर वातानुकूलित बसगाड्यांमध्ये २० रुपयांपर्यंतच्या सर्व तिकीटांवर प्रवासाची सुविधा उपलब्ध आहे. सदर योजना ३१ ऑगस्ट २०२२ ते १० सप्टेंबर २०२२ या कालावधीत उपलब्ध असणार आहे.

सदर योजना म्हणजे अलिकडेच बेस्ट उपक्रमाने जारी केलेल्या केवळ एका रुपयामध्ये सात दिवसात पाच डिजिटल फे-या या आझादी योजनेप्रमाणे लागू केलेली आणखी एक अमृतमहोत्सवी योजना आहे. दीड लाखांपेक्षा जास्त वापरकर्त्यांनी आझादी योजनेचा लाभ घेतला असून त्यांनी प्रवासाच्या ६.६ लाखांपेक्षा जास्त डिजीटल फे-या पूर्ण केल्या आहेत. सदर आझादी योजनेचे स्वागत मुंबईकर जनतेने भरभरून केले असून कित्येकजणांनी सदर आझादी योजना समाजमाध्यमांद्वारे इतरांपर्यंत पोहोचविली आहे असे बेस्ट उपक्रमाचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्र यांनी सांगितले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.