‘बेस्ट’चे ५ रुपये तिकीट, तरीही फुकट्यांची घुसखोरी! १.१३ लाख प्रवाशांवर कारवाई

154

मुंबईची जीवनवाहिनी अशी बेस्टची ओळख आहे. प्रवाशांना चांगली सुविधा मिळावी यासाठी बेस्टकडून अत्यंत माफक दरात सेवा पुरविली जाते. बेस्टकडून ५ किलोमीटरसाठी ५ रुपये तिकीट दर आकारले जाते परंतु तरीही काही प्रवासी विनातिकीट प्रवास करू लागले आहेत. या फुकट्या प्रवाशांमुळे बेस्टच्या उत्पन्नावर परिणाम होत आहे. बेस्टने २०१९ पासून आतापर्यंत बसमधून विनातिकीट प्रवास करणाऱ्या तब्बल १ लाख १३ हजार २७९ फुकट्या प्रवाशांवर कारवाई करून त्यांच्याकडून ७८ लाख ४४ हजार ६५० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.

( हेही वाचा : T20 Final : इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान मॅचच्या २४ तास आधी ICC ने केला गेमचेंज; पाऊस पडला तर कोण जिंकणार?)

बेस्टचे फुकटे प्रवासी 

कोरोनात बेस्टने मुंबईकरांना अविरत सेवा दिली, त्यानंतर बेस्टमध्ये प्रवाशांची गर्दी हळूहळू वाढू लागली. सध्या रोज ३५ लाखांहून अधिक प्रवासी बेस्टमधून प्रवास करत आहेत. मात्र अनेक प्रवासी विनातिकीट प्रवास करत असल्याचे निदर्शनास आले आहेत. काही जण गर्दीचा फायदा घेत निसण्याचा प्रयत्न करतात. बेस्ट प्रशासनाने सुरू केलेल्या विनावाहक सेवेचा अनेकांनी गैरफायदा घेतला.

विनावाहक बसेसची संख्या कमी केली 

बेस्ट उपक्रमाच्या आकडेवारीनुसार आतापर्यंत १ लाख १३ हजार २७९ विनातिकीट प्रवाशांवर कारवाई करण्यात आली आहे. गेल्या चार वर्षांमध्ये ७८ लाख ४४ हजार ६५० रुपये दंड वसलू करण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर आता सप्टेंबरमध्ये सुरू असलेल्या ११० विनावाहक बससेवांपैकी आता फक्त ६५ विनावाहक बसेस सुरू आहेत. फुकट्या प्रवाशांची संख्या लक्षात घेऊन काही मार्गांवर विनावाहक बस कमी करण्यात आल्या आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.