‘बेस्ट’च्या आणखी १०० गाड्यांमध्ये प्रवाशांना मिळणार ‘टॅप इन टॅप आउट’ सुविधा!

203

प्रवाशांकडे अनेकदा सुटे पैसे नसतात अशावेळी रोख रक्कमेचा व्यवहार टाळण्यासाठी डिजिटल तंत्रज्ञानावर आधारित ‘टॅप इन टॅप आउट’ सेवा बेस्ट उपक्रमाने सुरू केली आहे. मात्र सध्या मोजक्याच बसमध्ये ही सुविधा उपलब्ध आहे. येत्या १५ ते २० दिवसांमध्ये बेस्टच्या ताफ्यातील आणखी १०० बसमध्ये ‘टॅप इन टॅप आउट’ ही सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे, अशी माहिती देण्यात आली आहे.

( हेही वाचा : NCMC System : मुंबईकरांना एकाच तिकिटावर करता येणार बेस्ट, मेट्रो, मोनो, उपनगरीय रेल्वेने प्रवास)

बेस्ट उपक्रमाच्या टॅप इन टॅप आउट या सेवेचा लाभ प्रवासी चलो कार्डद्वारे किंवा चलो मोबाईल अ‍ॅपद्वारे घेऊ शकतात. बसमध्ये प्रवेश करताना तुम्हाला हे रिडर मशीन दिसतील यावर आपले स्मार्ट टॅप केले तर तुम्हाला तुमचे प्रवासी तिकीट प्राप्त होते. या तिकिटांचे पैसे तुमच्या कार्डातून आपोआप वजा केले जातात. तसेच सुट्ट्या पैशांसोबत वाहकासोबत होणाऱ्या वादापासून सुद्धा प्रवाशांची सुटका झाली आहे. टॅप इन-टॅप आउट बस सध्या लोकप्रिय होत आहेत. या सर्व बसेस ८० टक्के भरलेल्या असतात. मोबाईल अ‍ॅप किंवा चलो स्मार्टकार्ड वापरून लोक या बसेसमधून प्रवास करत आहेत. या बसेसची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे.

सध्या टॅप इन टॅप आउट ही सेवा केवळ ३५ गाड्यांमध्ये उपलब्ध आहे. त्यामुळे अनेक लोकांना या सेवेचा लाभ घेता येत नाही. येत्या १५ ते २० दिवसांमध्ये टप्प्याटप्प्यात १०० बसगाड्यांमध्ये ही सुविधा उपलब्ध करण्यात येईल, अशी माहिती उपक्रमाकडून देण्यात आली आहे. या महिन्यात या सेवेचा विस्तार करण्यात येणार आहे.

टॅप इन – टॅप आउट सेवा म्हणजे काय ?

टॅप इन म्हणजेच प्रवासी बसमध्ये चढताना टॅप इन करणार आणि बसमधून उतरताना टॅप आउट करतात. टॅप इन-टॅप आउट यामधील अंतरावरून प्रवाशांचे भाडे स्मार्टकार्ड वॉलेटमधून कापले जाते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.