डिजिटल तिकिटांचा वापर करणाऱ्यांना बेस्ट बसमध्ये प्रथम प्रवेश

202

प्रवाशांकडे अनेकदा सुटे पैसे नसतात अशावेळी रोख रक्कमेचा व्यवहार टाळण्यासाठी डिजिटल तंत्रज्ञानावर आधारित ‘टॅप इन टॅप आउट’ सेवा बेस्ट उपक्रमाने सुरू केली आहे. मात्र सध्या मोजक्याच बसमध्ये ही सुविधा उपलब्ध आहे. परंतु आता प्रवाशांच्या सोयीसोठी बेस्ट उपक्रमाने ए-७७, ए-१०२, ए-१०५, ए ११२, ए ११५, ए ११६, ए-११८, ए १२३, ए-१६२, ए-१६७, ए-३६९, ए-३७८, ए-४०१, ए-४०२, ए विशेष ८ आणि ए- विशेष ९ अशा एकूण १६ बसमार्गावर सुमारे २०० बसगाड्यांमधून टॅप इन टॅप आऊट बससेवा सुरु केलेली आहे.

( हेही वाचा : बेस्टची दिव्यांग व्यक्तींसाठी विशेष मोहीम)

२०० बसगाड्यांमधून टॅप इन टॅप आऊट सेवा

बेस्ट उपक्रमाच्या टॅप इन टॅप आउट या सेवेचा लाभ प्रवासी चलो कार्डद्वारे किंवा चलो मोबाईल अ‍ॅपद्वारे घेऊ शकतात. बसमध्ये प्रवेश करताना तुम्हाला हे रिडर मशीन दिसतील यावर आपले स्मार्ट टॅप केले तर तुम्हाला तुमचे प्रवासी तिकीट प्राप्त होते. या तिकिटांचे पैसे तुमच्या कार्डातून आपोआप वजा केले जातात. बेस्ट उपक्रम डिजिटायजेशनच्या बाबतीत संपूर्ण भारतातील प्रथम क्रमांकाची शहर परिवहन संस्था बनली आहे.

१ रुपयात प्रवासाला प्रवाशांची पसंती 

‘जास्तीत जास्त प्रवाशांना अडथळ्याविना जागतिक दर्जाचा अनुभव देण्याच्या उद्देशाने आम्ही डिजिटल बससेवांचे लोकार्पण केले आहे. केवळ १ रुपयात प्रवास या ‘बेस्टच्या योजनेला मुंबईकरांनी अभूतपूर्व प्रतिसाद दिला आहे.’ असे बेस्टचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्र यांनी म्हटले आहे. १ रुपयात बेस्ट आजादी योजनेअंतर्गत बेस्ट चलो अ‍ॅपच्या सहाय्याने प्रवासी सात दिवसात कोणत्याही लांबीच्या बसमार्गावर पाच वेळा बसप्रवास करु शकतात. सदर योजना दिनांक ३१ ऑगस्ट २०२२ पर्यंत सुरु आहे. असेही उपक्रमाने स्पष्ट केले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.