‘बेस्ट’ बसने प्रवास करताना बुक करा तुमची जागा; लवकरच सुरू होणार आरक्षण सुविधा!

91

बेस्ट ही मुंबईची लाईफलाईन समजली जाते त्यामुळे बेस्ट उपक्रमाच्या दैनंदिन प्रवाशांची संख्या जवळपास ३१ लाखांवर गेली आहे. बसमध्ये वाढणाऱ्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर उपक्रमाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. बेस्ट उपक्रमाने मोबाईल अ‍ॅपआधारित टॅक्सीप्रमाणे बससेवा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. याद्वारे प्रवाशांना बसगाडीमध्ये आपले आसन (SEAT) बुकिंग प्रवासाआधी करता येणार आहे. ही सेवा पुढील महिन्यापासून सुरू होणार आहे.

( हेही वाचा : BEST अमृत महोत्सव! वाचा आपल्या ‘बेस्ट’चा रंजक प्रवास)

आगाऊ सीट बुकिंग 

मुंबईकरांचा प्रवास सोयीचा व्हावा यासाठी अनेक अ‍ॅपआधारित टॅक्सीसेवा कार्यरत आहेत याला प्रवाशांचा सुद्धा सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी बसमध्ये प्रवास करताना आगाऊ सीट बुकिंग या संकल्पनेवर सध्या अभ्यास सुरु असून सप्टेंबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात ही सेवा सुरू करण्याचे बेस्ट प्रशासनाचे ध्येय आहे.

४५ आसनी विषेश १०० बसगाड्या 

या सेवेसाठी ४५ आसनी १०० बसगाड्या टप्प्याटप्प्याने बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यात दाखल होणार आहेत. या बसगाड्यांमधून प्रवाशांना उभ्याने प्रवास करता येणार नाही. तसेच प्रवासाआधी आगाऊ आरक्षण करावे लागेलय त्यासाठी मोबाईन अ‍ॅप उपलब्ध करण्यात येईल. असे बेस्ट उपक्रमाचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्र यांनी सांगितले.

ऑनलाईन तिकीट

मोबाईल अ‍ॅपद्वारे प्रवाशांना बेस्ट बसगाडीचा मार्ग, वेळ, अन्य सेवांची माहिती मिळेल. त्यानुसार नियोजन करून प्रवाशांना बसमधील आसन आरक्षित करता येईल आणि याचे तिकीट सुद्धा ऑनलाईन काढता येणार आहे. तसेच, केवळ आसन आरक्षित करणाऱ्या प्रवाशांनाच या बसमधून प्रवास करता येणार आहे या गाड्यांमधून प्रवासी उभ्याने प्रवास करू शकत नाहीत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.