बेस्ट बस मार्गात अनंत चतुर्दशीनिमित्त तात्पुरते बदल!

अनंत चतुर्दशी निमित्ताने लालबाग परळ भागातून मोठ्या प्रमाणात गणपती विसर्जन मिरवणूका निघतात तसेच शुक्रवारी सकाळी १० ते ११ च्या दरम्यान लालबागचा राजा, चिंतामणी, गणेश गल्ली या काही मानाच्या गणपतीच्या मिरवणूका मार्गस्थ झाल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर मुंबईतील अनेक बेस्ट बसचे मार्ग बदलण्यात आले आहेत.

( हेही वाचा : लालबागचा राजा विसर्जनासाठी मार्गस्थ, हजारो भाविकांची राजाला निरोप देण्यासाठी गर्दी )

बदल करण्यात आलेले बेस्ट मार्ग

  • भारतमाता येथे माधव पालव मार्ग बंद केल्यामुळे बसमार्ग क्रमांक २,६३,६६ अप दिशेने ८.४५ वाजल्यापासून एस ब्रिजवरून भायखळा पूर्व, डॉ.आंबेडकर मार्ग, मडके बुवा चौक येथून वळवण्यात आले आहेत.
  • बसमार्ग क्रमांक १४ च्या बसगाड्या एस ब्रिजवरून, भायखळा पू्र्व ,डॉ.आंबेडकर मार्ग, के.इ.एम रुग्णालय मार्गे परावर्तित केल्या आहेत.
  • मुंबई पोलिसांनी ना.म.जोशी मार्ग बंद केल्यामुळे बसमार्ग क्रमांक ४४, ५० व ६६ हे अप दिशेत ९.३० वाजल्यापासून सात रस्ता येथून केशवराव खाडे मार्ग, एस ब्रिज मार्गे भायखळा पश्चिम असे परावर्तित केले आहे.

उपक्रमाचे आवाहन 

प्रवाशांनी याची नोंद घेऊन आपला प्रवास करावा, तसेच गर्दीच्या पार्श्वभूमीवर विसर्जन स्थळांकडे जाणाऱ्या अनेक बसमार्गावर परिणाम होईल असे बेस्ट उपक्रमाने स्पष्ट केले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here