बेस्ट बसमार्गात ‘असे’ होणार बदल! जाणून घ्या…

177

बेस्ट उपक्रमाच्या बसमार्गांमध्ये दिनांक १ जुलै २०२२ पासून काही बदल करण्यात येत आहेत. यामध्ये काही बसमार्गांच्या प्रवासमार्गात बदल करण्यात येणार असून काही बसमार्ग विस्तारीत करण्यात येणार आहेत. तसेच काही बसमार्गांवर समाधानकारक प्रतिसादाअभावी रद्द करण्यात येणार आहेत याविषयी संपूर्ण माहिती खालीलप्रमाणे आहे…

( हेही वाचा : बेस्ट कामगारांचा असंतोष दूर करण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील! ड्युटी शेड्युलमध्ये सुधारणा होणार?)

बसमार्गातील बदलांबाबतचा विस्तृत तपशील पुढीलप्रमाणे आहे…

१. बसमार्ग ५४ – वरळी आगार आणि ऐरोली बसस्थान दरम्यान परावर्तित होणाऱ्या या बसमार्गाचे वांद्रे – कुर्ला संकुल येथून छेडानगर दरम्यान कुर्ला आगार मार्गे असलेले प्रवर्तन वांद्रे – कुर्ला संकुल आणि एव्हरार्डनगर यांना जोडणाऱ्या मार्गावरून परावर्तित करण्यात आली आहे.

वरळी आगार
पहिली बस – ६ वाजता
शेवटची बस – रात्री ९ वाजता

ऐरोली बसस्थानक
पहिली बस – ७.३० वाजता
शेवटची बस – रात्री १०.५० वाजता

२. बसमार्ग क्र. सी-३०५- बँकचे आगार आणि धारावी आगार दरम्यान प्रवर्तित होणा-या या बसमार्गाचे पंडित पलुस्कर चौक आणि वत्सलाबाई देसाई चौक दरम्यान वसंतराव नाईक चौक (ताडदेव) मार्गे असलेले प्रवर्तन गोपाळराव देशमुख मार्ग (पेडर रोड) मार्गे परावर्तित करण्यात आली आहे.

बॅकबे आगार –
पहिली बस – ८.३०
शेवटची बस – रात्री ९.४०

धारावी आगार –
पहिली बस – ७ वाजता
शेवटची बस – रात्री १० वाजता

३. बसमार्ग क्र. ३१९ कुर्ला स्थानक (प) आणि मजास आगार दरम्यान प्रवर्तित होणा-या या यसमार्गाचे मरोळ आगार आणि नमस्कार जंक्शन दरम्यान सीप्झ मार्गे असलेले प्रवर्तन शांतीनगर, होली रिपरीट रुग्णालय मार्गे परावर्तित करण्यात आली आहे.

कुर्ला स्थानक
पहिली बस – ६ वाजता
शेवटची बस – रात्री ८.३५ वाजता

मजास आगार
पहिली बस – ५.१५ वाजता
शेवटची बस – रात्री ७.२५ वाजता

४. बसमार्ग क्र. ३५४ – वडाळा आगार आणि कन्नमवारनगर – २ दरम्यान प्रवर्तित होणाऱ्या या बसमार्गाचे खोदादाद सर्कल ( दादर टी.टी.) व वडाळा आगार दरम्यानचे प्रवर्तन रद्द करून हा बसमार्ग खोदादाद सर्कल ( दादर टी.टी.) येथून वीर हुतात्मा भाई कोतवाल उद्यान ( प्लाझा), प्रबोधनकार ठाकरे चौक, प्रभादेवी मार्गे वरळी आगार येथे समाप्त करण्यात येणार आहे.

वरळी आगार
पहिली बस – ५ वाजता
शेवटची बस – रात्री ९.२० वाजता

कन्नमवारनगर – २
पहिली बस – ६ वाजता
शेवटची बस – रात्री १०.३० वाजता

५. बसमार्ग क्र एसी ३८१
या बसमार्गाचे प्रवर्तन पुढीलप्रमाणे दोन टप्प्यात प्रवर्तित करण्यात येत आहे.

अ) घाटकोपर बसस्थानक ते टाटा वीज केंद्र ( चेंबूर)
पहिली बस – ५ वाजता, शेवटची बस – रात्री ९.५५ वाजता
ब) घाटकोपर रेल्वे स्थानक ( पूर्व) ते टाटा वीज केंद्र ( चेंबूर)
पहिली बस – ६.४० वाजता, शेवटची बस – रात्री १०.५० वाजता

६. बसमार्ग क्र. एसी ४३० – या बसमार्गाचे प्रवर्तन पुढीलप्रमाणे दोन टप्प्यात प्रवर्तित करण्यात येत आहे.

अ) घाटकोपर आगार ते माहुलगाव
ब) घाटकोपर रेल्वे स्थानक ( पूर्व) ते माहुलगाव

७. बसमार्ग क्र. एसी ४८१ – या बसमार्गाचे प्रवर्तन पुढीलप्रमाणे दोन टप्प्यात प्रवर्तित करण्यात येत आहे.

अ) घाटकोपर बसस्थानक ते वाशीनाका एमएमआरडीए वसाहत
ब) घाटकोपर रेल्वे स्थानक ( पूर्व) ते वाशीनाका एमएमआरडीए वसाहत

८. बसमार्ग क्र सी – ५१३ मुलुंड आगार आणि वाशी रेल्वे स्थानक दरम्यान प्रवर्तित होणाऱ्या या बसमार्गांचे मुलुंड न्यायालय ल गव्हाणपाडा दरम्यान निलमनगर, गव्हाणपाडा, अग्निशमन केंद्र येथून हा मार्ग रद्द करून हा बसमार्ग मुलुंड न्यायालय आणि गव्हाणपाडा दरम्यान थेट जटा शंकर डोसा व वासुदेव बळवंत फडते मार्गाने प्रवर्तित होईल.

९. बसमार्ग क्र सी -२१ इलेक्ट्रिक हाऊस आणि अणुशक्तीनगर बसस्थानक दरम्यान प्रवर्तित होणाऱ्या एसी २६ मध्ये रुपांतर करण्यात येत आहे.

१०. बसमार्ग क्र.६२ वीर हुतात्मा भाई कोतवाल उद्यान (प्लाझा) आणि विद्याविहार बसस्थानक (प) दरम्यान प्रवर्तित होणा-या या बसमार्गाचे प्रवर्तन पं. पलुस्कर चौक (ऑपिराहाऊस) व विद्याविहार बसस्थानक (प) दरम्यान जसलोक रुग्णालय, आचार्य अत्रे चौक, श्री सिध्दीविनायक मंदिर, राम गणेश गडकरी चौक, वांद्रे कुर्ला संकुल मार्गे पुनः स्थापित करण्यात येत आहे.

११. बसमार्ग क्र. ४२९ –घाटकोपर स्थानक (प) आणि मिलिंदनगर दरम्यान प्रवर्तित होणा-या या बसमार्गाचे प्रवर्तन पुनः स्थापित करण्यात येत आहे.

१२. बसमार्गावरील प्रवाशांचा वाढता प्रतिसाद विचारात घेऊन प्रवाशांच्या सोयीकरीता बसमार्गावर अतिरिक्त बसफेऱ्यांचे प्रवर्तन कार्यान्वित करण्यात येत आहे.

  • सी -१५ वरळी आगार ते मजास आगार
  • सी – ४० प्र ठाकरे उद्यान शिवडी बसस्थानक ते मजास आगार
  • सी – ६१ मुलुंड आगार ते ओवळेगाव
  • ए – २२० वांद्रे बसस्थानक ( पश्चिम) ते शेर्लीगाव
  • ए – २४९ अंधेरी स्थानक ( पश्चिम) ते सातबंगला बसस्थानक
  • ए – २७३ मालाड स्थानक ( पश्चिम) ते मालवणी ब्लॉक क्रमांक ५
  • ए – ३३४ मरोळ आगार ते जांभूळपाडा
  • ए – ३६९ चेंबूर वसाहक ते वाशीनाका एमएमआरडीए वसाहत

बसमार्ग विलिनीकरण

ए २५१ सातबंगला बसस्थानक ते वेसावा यारी रोड
सी – ११ इलेक्ट्रिक हाऊस ते धारावी आगार

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.