बेस्ट मार्गात ‘असे’ होणार बदल! जाणून घ्या…

187

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत (एमएमआरडीए) अंधेरी पूर्व ते दहिसर पूर्व मेट्रो ७ आणि दहिसर पश्चिम ते डीएन नगर या मेट्रो २ अ या दोन्ही मार्गांच्या पहिला टप्याचे लोकार्पण २ एप्रिल गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर प्रवाशांच्या सोयीसाठी २ एप्रिलपासून काही बेस्ट मार्गात बदल करण्यात आले आहेत.

( हेही वाचा : मार्चमध्ये आलेली उष्णतेची लाट धोकादायक; तापमानात चंद्रपूर जगात पहिल्या स्थानी )

मेट्रो २ (अ) च्या स्थानकांवर उपलब्ध असलेले बसमार्ग

मेट्रो स्थानक – बसथांबा – बसमार्ग

  • दहिसर – घरटन पाडा – ७००, ७०६, ७१८
  • अप्पर दहिसर – सेंट मेरी स्कूल, विठ्ठल रुक्मिणी मंदिर – २०७. २०९, सी १२
  • कांदरपाडा – ऋषी संकुल – सी १२, ए.२४०, ए-२४५
  • मंडपेश्वर – सरदार दल्लभभाई पटेल महाविद्यालय- सी १२, , ए-२४५
  • एक्सर – शांती आश्रम, एसके रिसॉर्ट – सी १२
  • बोरिवली पश्चिम – डॉन बॉस्को – सी १२, २०२, २२४, २२६, २४४, २४६, २४७, २६९, २७७, २९४, ४६१, ७२०
  • पहाडी एक्सर- शिंपवलीगाव – २४५, २४७, २९४, २९६
  • कांदिवली – कामराज नगर – २२३, २८०, सी-१२
  • डहाणुकरवाडी – डहाणुकरवाडी – २०४, २०६, २०७, २४४, २४६, २८०, २८१, २८६, ४६०

मेट्रो ७ च्या स्थानकांवर उपलब्ध असलेले बसमार्ग

मेट्रो स्थानक – बसथांबा – बसमार्ग

  • दहिसर – घरटनपाडा – ७००, ७०६, ७१८
  • ओवरीपाडा – जय महाकाली मंदिर – २९७, २९८, ७००, ७०७, ७१८
  • राष्ट्रीय उद्यान – ओंकारेश्वर मंदिर – १८८, २९३, २९७, २९८, २९९, ४७०, ४७८, ४९८, ५२४, ६२९, ७००, ७०१, ७०२, ७०३, ७०५, ७०६, ७०९, ७१०, ७१८, अ-६०
  • देवीपाडा – देवीपाडा – ४७०, ४७८, ४७९, ४९८, ५२४, ७०१, ७०२, ७०३, ७०५, ७०६, ७०९, ७१०, ७१८
  • मागाठणे – मागाठणे दूरध्वनी केंद्र – २०९, २२३, २२६, ४४०, ४६१, ४७०, ४७८, ४७९, ४९८, ५२४, ६२९, ७०१, ७०३, ७०५, ७०६, ७१८
  • पोयसर – बी. एच. ए. डी – २२६, ४४०, ४६१, ४७०, ४७८, ४९८, ५२४, ७०१, ७०५, ७०६, ७१८, सी-७१, सी-७२, ए-३००, ए-६०
  • आकुर्ली – बाण डोंगरी – २८२, २८९, ए२८७, ए-२८८, ए३००
  • कुरार – पुष्पा पार्क – ६२४, २८१
  • दिंडोशी – पठाणवाडी – ३४५, ६०१
  • आरे – विरवाणी इस्टेट – ३२६, ३२७, ३४३, ३४४, ३४६, ३४९, ३९८, ४६०, ४८९

नवीन बसमार्ग –

सद्यस्थितीत उपलब्ध असलेल्या उपरोक्त बससेवांव्यतिरिक्त दोन नवीन बसमार्ग सुरु करण्यात आले आहेत.

१. बसमार्ग क्र. ए-६४७- हा बसमार्ग शिवशाही प्रकल्प येथून मेट्रो-७ वरील आरे मेट्रो स्थानका दरम्यान नागरी निवारा प्रकल्प, सामना परिवार, वाघेश्वरी मंदिर, गोकुळधाम मार्केट, दिंडोशी आगार, विरवाणी इस्टेट, गोरेगांव चेकनाका मार्गे प्रवर्तित करण्यात येईल.

बसथांबे – गोरेगांव चेकनाका क्र.१ विरवाणी इस्टेट जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग नाका दिंडोशी बसस्थानक सत्र न्यायालय दिंडोशी गोकुळधाम मार्केट वाघेश्वरी मंदिर सामना परिवार सुयश शॉपिंग सेंटर नागरी निवारा संकल्प सोसायटी इन्फिनीटी आय. टी. पार्क मैत्री सोसायटी- नागरी निवारा विभाग १ व २ सातपुडा सोसायटी शिवशाही प्रकल्प / मंत्री पार्क

२. बसमार्ग क्र.२७४ – हा बसमार्ग कांदिवली स्थानक (प) आणि बंदर पाखाडी दरम्यान मेट्रो रेल-२ (ब) च्या डहाणुकरवाडी स्थानकाजवळून प्रवर्तित करण्यात येईल.

बसथांबे – कांदिवली स्थानक (प) देना बँक काळा मारुती मंदिर महात्मा गांधी तरण तलाव कांदिवलीगांव वैशाली भवन डहाणुकरवाडी मेट्रो स्थानक कामराजनगर ज्ञानेश्वर विद्यालय नेताजीनगर पब्लिक स्कुल बंदर पाखाडीगांव

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.