१ सप्टेंबरपासून बेस्ट बसच्या बाबतीत काही बदल करण्यात आले आहेत. यामध्ये बेस्टचे १५ नवे मार्ग सुरू होणार असून, २२ बस मार्ग बंद केले जाणार आहेत. बेस्ट उपक्रमाच्या सर्व बसमार्गांचा आढावा घेऊन प्रवाशांच्या सूचना लक्षात घेऊन बूससेवेत बदल करण्यात येतात. 1 सप्टेंबर २०२१ पासून हे बदल अंमलात आणले जातात.
हे १५ नवे बसमार्ग सुरू
- सी ए-१- ही नवी वातानुकुलीत बस इलेक्ट्रिक हाऊस ते खोदादाद सर्कल दरम्यान सी. एस. टी.-भायखळा-लालबाग परळ मार्गे जाईल, या बस मार्गावरील ज्यादा बस प्लाझा शिवाजी पार्कपर्यंत धावतील.
- सी-२- यावरील बस इलेक्ट्रिक हाऊस ते धारावी आगार दरम्यान सी. एस. टी.-भायखळा-लालबाग परळ दादर सायन मार्गे धावेल.
- सी-१५- ही नवी बस वरळी आगार ते दिंडोशी आगार दरम्यान, प्लाझा माहीम कला नगर प. द्रुतगती मार्गाने धावेल.
- सी-५४- वरळी आगार ते ऐरोली बस स्थानक दरम्यान प्लाझा माहीम बी के सी सांताक्रूझ चेंबूर जोडमार्ग घाटकोपर आगार विक्रोळी पोलिस स्टेशन भांडुप पंपिंग स्टे ऐरोली टोलनाका मार्गे जाईल.
- ५६- ही नवीन बस वरळी आगार ते सांताक्रूझ आगार दरम्यान प्लाझा माहीम वांद्रे खार दांडा शास्त्री नगर मार्गे धावेल.
- ए-१०६- आर सी चर्च ते चर्चगेट दरम्यान कुलाबा हुतात्मा चौक मार्गे जाईल.
- ए-१०७- नेव्ही नगर ते महात्मा फुले मार्केट दरम्यान कुलाबा हुतात्मा चौक मार्गे धावेल.
- ए-१०९- आर सी चर्च ते महात्मा फुले मंडई दरम्यान कुलाबा म्युझियम रिजर्व बँक सी एसटी मार्गे जाईल.
- १८२- महेश्वरी उद्यान ते मालाड आगार दरम्यान सायन कला नगर खेरवाडी अंधेरी जोगेशवरी बेहराम बाग मार्गे जाईल.
- ३१९- कुर्ला स्थानक पश्चिन ते मजास आगार दरम्यान कमानी साकिनाका मरोळ नाका मरोळ मरोशी सिप्झ मरोळ आगार कानोसा तक्षशिला नमस्कार मार्गे जाईल.
- ए-४०१- मुलुंड स्थानक पश्चिम ते वैशाली नगर मार्गे भक्ती मार्ग बालराजेश्वर मंदिर मार्ग जाईल.
- ४२३- महाराणा प्रताप चौक मुलुंड ते संघर्ष नगर म्हाडा चांदीवली दरम्यान मुलुंड स्थानक भांडुप गांधी नगर पवई हिरानंदानी शेट्टी विद्यालय मार्गे धावेल.
- ४६४- मर्यादित बस घाटकोपर आगार ते गोरेगाव स्थानक प. दरम्यान विक्रोळी आगार गांधी नगर पवई सिप्झ मजास जोगेश्वरी बेहराम बाग मार्गे जाईल.
- ए-४९३- महाराणा प्रताप चौक मुलुंड ते अणुशक्ती नगर दरम्यान भांडूप विक्रोळी घाटकोपर आगार छेडा नगर महाराष्ट्र नगर मानखुर्द मार्गे धावेल.
- ए-६९१- मुलुंड स्थानक पश्चिम ते खिंडीपाडा मार्गे भांडूप सोनापूर मुलुंड वसाहत मार्गे रिंग धावेल.
हे मार्ग होणार बंद
- सी-६- मंत्रालय ते आंबेडकर उद्यान चेंबूर
- सी-८- मंत्रालय ते शिवाजी नगर आगार
- १६- (मर्यादित) वडाळा आगार ते वाशी नाका एम एम आर डी ए वसाहत चेंबूर
- २०- (मर्यादित) म्युझियम ते शिवाजी नगर आगार \
- ३०- (मर्यादित) मुंबई सेंट्रल आगार ते विक्रोळी आगार
- ४३- महाराणा प्रताप चौक माझगाव ते प्रतीक्षा नगर
- सी-५०- वर्ल्ड ट्रेंड सेंटर ते वाशी बस स्थानक
- ६१- फोर्ट मार्केट ते मच्छीमार नगर माहीम
- ६२- प्लाझा ते विद्याविहार बस स्थानक प.
- ७६- मंत्रालय ते प्रतीक्षा नगर
- १७३- राणी लक्ष्मीबाई चौक मार्गे टिळक रुग्णालय
- २२९- सांताक्रूझ आगार ते शांती आश्रम
- ३०६- (मर्यदित) सांताक्रूझ बस स्थानक पूर्व ते मुलुंड स्थानक पश्चिम
- ३०९- (मर्यादित) कुर्ला स्थानक पश्चिम ते गोराई आगार
- ए ३२९- आगरकर चौक अंधेरी ते शिवाजी नगर आगार
- ४४८- (मर्यादित) प्रतीक्षा नगर आगार ते बोरिवली स्थानक पूर्व
- ४५८- (मर्यदित) मालाड आगार ते मॅरेथॉन चौक ठाणे
- ४९१- (मर्यादित) सीप्झ ते ब्रह्मांड ठाणे
- १०- बी के सी ते बोरिवली स्थानक पूर्व
- बी के सी १२ वांद्रे टर्मिनस पूर्व ते जलवायू विहार खारघर
- बी के सी १३ वांद्रे टर्मिनस पूर्व ते महाराणा प्रताप चौक मुलुंड
- बी के सी १६ बी के सी ते सिप्झ गाव
6 बसमार्गांचा विस्तार
- २५ (मर्यादित)- बॅकबे आगार ते राणी लक्ष्मी चौक दरम्यान धावणारी ही बस चुनाभट्टी पर्यंत धावेल.
- ३५- दूरदर्शन ते मरोळ मरोशी बस स्थानकापर्यंत धावणारी ही बस सिप्झ बस स्थानक पर्यंत जाईल.
- ७५- राणी लक्ष्मी चौक ते भक्ती पार्क संकुल दरम्यान धावणारी ही बस चुनाभट्टी पर्यंत जाईल.
- ए-२१७- दादर स्थानक पूर्व ते के.ई.एम. रुग्णालय पर्यंत जाणारी ही बस परळ बेस्ट कामगार वसाहत पर्यंत धावेल.
- ए-३७२- शिवाजी नगर जंक्शन ते ट्रोम्बे पर्यंत जाणारी ही बस रमाबाई नगर मार्गे घाटकोपर आगार पर्यंत जाईल.
- ५१३ मर्यादित मुलुंड अग्निशमन केंद्र ते वाशी रेल्वे स्थानक दरम्यान धावणाऱ्या या बसचा मुलुंड आगार पर्यंत धावेल.