बेस्ट बसमध्ये प्रवाशांची प्रचंड गर्दी! ‘या’ मार्गावर अतिरिक्त गाड्या सोडण्याची मागणी

बेस्ट बसचे तिकीटदर कमीत कमी ५ रुपये केल्यापासून प्रवाशांनी दैनंदिन प्रवासासाठी बेस्टला पसंती दिली आहे. सध्या दररोज ३० ते ३५ लाख प्रवासी बेस्टने प्रवास करतात. त्यामुळे काही मार्गावरील बसेसमध्ये प्रवाशांची अतिरिक्त होते. कांदिवली पश्चिम चारकोप मार्गावर सकाळी कार्यालयात जाताना रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या बसेसमध्ये प्रचंड गर्दी होते. प्रवाशांना बसच्या दारावर लटकत प्रवास करावा लागतो. असा प्रवास करणे धोकादायक आहे त्यामुळे लवकरात लवकर याकडे बेस्ट उपक्रमाने लक्ष द्यावे या आशयाचे ट्वीट @MayurPalan4 या प्रवाशाने केले आहे. यामध्ये बेस्ट उपक्रमासाह हिंदुस्थान पोस्टलाही टॅग करण्यात आले आहे.

( हेही वाचा : विमान अपघाताच्या कारणाची माहिती देणार्‍या ब्लॅक बॉक्सबद्दल तुम्हाला माहिती आहे का? )

कांदिवली पश्चिम ( चारकोप ) या मार्गावरून रेल्वे स्थानकाकडे बसक्रमांक २४४ आणि २८६ या २ बसेस जातात. या बसला सकाळच्यावेळी प्रचंड गर्दी असते. या बसेसमधून महिला प्रवासी आणि अपंग नागरिकांना प्रवास करणेही अशक्य होत आहे त्यामुळे बेस्ट उपक्रमाने प्रवाशांच्या सोयीचा विचार करून या मार्गावरील बसेसची वारंवारता वाढवावी अशी मागणी कांदिवली पश्चिमेतील प्रवाशांनी केली आहे.

ट्विटरवर टॅग करत मागणी

@MayurPalan4 या ट्विटर युजरने ट्वीट करत हिंदुस्थान पोस्ट आणि बेस्ट उपक्रमाला टॅग केले आहे. तसेच या मार्गावरील बसमधील गर्दीची छायाचित्रे सुद्धा व्हायरल केली आहेत. यामार्गावर गर्दीच्या वेळी प्रवास करणे किती धोकादायक आहे हे आपल्याला फोटोंमधून पाहता येत आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here