बेस्ट गिफ्ट! दिवाळीसाठी १४० अतिरिक्त बससेवा

174

दिवाळीत अनेक लोक खरेदीसाठी बाहेर पडतात तसेच सणासुदीच्या पार्श्वभूमीवर शहरात अतिरिक्त गर्दी सुद्धा होते. दिनांक २२ ऑक्टोबर ते २६ ऑक्टोबर २०२२ या कालावधीत दीपावलीच्या निमित्ताने मुंबईतील वीर कोतवाल उद्यान (प्लाझा-दादर), वांद्रे, महात्मा फुले मार्केट, काळबादेवी, एपीएमसी मार्केट (वाशी) यासारख्या बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी लोक मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. अशा प्रवाशांच्या सोयीसाठी बेस्ट उपक्रमाच्यावतीने रविवार दिनांक १६ ऑक्टोबर २०२२ ते शनिवार दिनांक २३ ऑक्टोबर २०२२ या कालावधीत विविध बसमार्गावर २५ अतिरिक्त बसफेऱ्या चालविण्यात येणार आहेत.

( हेही वाचा : पीएफआयच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपचा अ‍ॅडमिन पाकिस्तानी; एटीएसच्या चौकशीत माहिती उघड )

१४० अतिरिक्त बससेवा

बुधवार दिनांक २६ ऑक्टोबर २०२२ रोजी भाऊबीज आणि बलिप्रतिपदा (दिवाळी पाडवा ) हे दोन्ही दिवस एकत्रित येत आहेत. या दिवशी संपूर्ण मुंबई शहरात विशेषतः पूर्व-पश्चिम या दोन्ही भागात पश्चिम द्रुतगती महामार्ग, भाईंदर तसेच नवी मुंबईकडे जाणा-या बसमार्गांवर प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेऊन बेस्ट उपक्रमाने १४० अतिरिक्त बससेवा उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेतला आहे. तरी प्रवाशांनी या बससेवांचा अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन बेस्ट उपक्रमाच्या वतीने करण्यात येत आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.