मध्यरात्रीचाही प्रवास होणार ‘बेस्ट’!

95

रेल्वेसेवा रात्री १२ वाजता बंद झाल्यावर कामानिमित्त बाहेर असलेल्या प्रवासी विशेषत: हॉस्पिटल, हॉटेल, विमानतळ अशा विविध ठिकाणी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या घरी पोहचण्यास वाहतुकीचे कोणतेही साधन उपलब्ध होत नसल्याने अशा प्रवाशांची मोठया प्रमाणावर गैरसोय होते. यामुळेच बेस्ट उपक्रमाकडून प्रवाशांच्या सोयीकरता मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

( हेही वाचा : मुंबईकरांसाठी लवकरच सुरू होणार नवीन रेल्वे स्थानक! )

प्रवाशांची होणारी गैरसोय लक्षात घेता बेस्ट उपक्रमामार्फत रात्री १२.०० ते पहाटे ५.०० वाजेपर्यंत प्रत्येक तासाला खाली दिलेल्या बसमार्गावर बससेवा सुरु करण्याचे ठरवण्यात आले आहे. या बसगाड्या सोमवार दिनांक ७ मार्च पासून सुरू करण्यात येणार आहेत.

बसक्रमांक १ – इलेक्ट्रिक हाऊस ते माहिम बसस्थानक
बसक्रमांक ६६ मर्या. – इलेक्ट्रिक हाऊस ते राणी लक्ष्मीबाई चौक
बसक्रमांक २०२ मर्या. – माहिम बसस्थानक ते पोयसर आगार
बसक्रमांक ३०२ – राणी लक्ष्मीबाई चौक ते महाराणा प्रताप चौक (मुलुंड)
बसक्रमांक ३०५ – बॅकबे आगार ते राणी लक्ष्मीबाई चौक
बसक्रमांक ४४० मर्या. – बोरिवली स्थानक पूर्व ते द्वारा देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमानतळ

हात दाखवा बस थांबवा

बेस्ट उपक्रम रात्री उशिरा जरी सेवा देणार असेल तरीही प्रवासभाडे सर्वसाधारण आकारण्यात येणार आहे. तसेच हात दाखवा बस थांबवा या योजनेचा लाभ घेत प्रवासी बस थांबवू शकतात. अहोरात्र चालणा-या बससेवेचा लाभ अधिकाधिक प्रवाशांनी घ्यावा असे आवाहन बेस्ट उपक्रमाद्वारे करण्यात आले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.