विमानतळावरून आता २४ तास ‘बेस्ट’ सेवा! पहा वेळापत्रक…

128

आंतरराष्ट्रीय विमानतळावरून दररोज अनेक प्रवासी प्रवास करतात. याच पार्श्वभूमीवर विमान प्रवाशांसाठी बेस्ट उपक्रमाकडून विशेष बस चालवल्या जातात. परंतु रात्री १२ वाजल्यानंतर प्रवासी व विमानतळावरील कर्मचाऱ्यांना त्यांच्या घरी पोहचण्यास वाहतुकीची मर्यादित साधने उपलब्ध असतात. म्हणूनच प्रवाशांची होणारी गैरसोय लक्षात घेता बेस्ट उपक्रमामार्फत मोठा निर्णय घेण्यात आला असून आता विमानतळावरील बससेवा २४ तास सुरू राहणार आहे.

बससेवा २४ तास सुरू

मार्ग – अंतर – तिकीट

  • आंतरराष्ट्रीय विमानतळ १ ते बॅकबे – १७५ रुपये
  • आंतरराष्ट्रीय विमानतळ २ ते वाशी – १५० रुपये
  • आंतरराष्ट्रीय विमानतळ ४ ते ठाणे – १५० रुपये

विमातळावरून सुटणाऱ्या बेस्ट बसचे वेळापत्रक 

New Project 12

मध्यरात्रीही उपलब्ध 

 

हात दाखवा बस थांबवा

बेस्ट उपक्रम रात्री उशिरा जरी सेवा देणार असेल तरीही प्रवासभाडे सर्वसाधारण आकारण्यात येणार आहे. तसेच हात दाखवा बस थांबवा या योजनेचा लाभ घेत प्रवासी बस थांबवू शकतात. अहोरात्र चालणा-या बससेवेचा लाभ अधिकाधिक प्रवाशांनी घ्यावा असे आवाहन बेस्ट उपक्रमाद्वारे करण्यात आले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.