BEST कडून ‘हिंदुस्थान पोस्ट’च्या बातमीची दखल; मोठ्या बसेस, स्वस्त प्रवासामुळे दिलासा!

274
BEST कडून ‘हिंदुस्थान पोस्ट’च्या बातमीची दखल; मोठ्या बसेस, स्वस्त प्रवासामुळे दिलासा!
  • खास प्रतिनिधी 

मुंबईतील बेस्ट (BEST) उपक्रमातर्फे कंत्राटी पद्धतीवर चालवण्यात येणाऱ्या मिनी वातानुकूलित बसेसमधून कंत्राटदारांकडून प्रवाशांची लूट होत असल्याचे वृत्त ‘हिंदुस्थान पोस्ट’ने १८ सप्टेंबर २०२४ रोजी दिले होते. त्याची बेस्ट प्रशासनाने दखल घेतली आणि कार्यवाहीदेखील केली.

बातमीचा आशय

मुंबई उपनगरातील मजास डेपो ते आगरकर चौक या ४४१ क्रमांकाच्या बस रूटवर किंवा मजास डेपो ते जोगेश्वरी स्टेशन ४४२ या रूटवर चालतात. या रूटवर चालवण्यात धावणाऱ्या मिनी वातानुकूलित बसेसची नीट काळजी घेतली जात नाही, तर सगळ्याच बसेसची वातानुकूलित यंत्रणा बंद असते मात्र तरीही तिकीट वातानुकूलित प्रवासाचे आकरले जात असे. एकीकडे बेस्ट (BEST) उपक्रमाकडून कंत्राटदाराला वातानुकूलित बस चलवण्याचचे पैसे दिले जात असताना, कंत्राटदार प्रवाशांकडूनही वातानुकूलितचे भाडे आकारात असेल तर कंत्राटदाराला दोन्हीकडून फायदा आणि यात प्रवाशांची लूट होते, अशा आशयाची ही बातमी होती.

(हेही वाचा – IPL 2025 : मुंबई इंडियन्सच्या मुख्य प्रशिक्षकपदी महेला जयवर्धनेची वापसी)

६ रुपये ऐवजी ५ रुपये तिकीट

या बातमीची दखल घेत बेस्ट (BEST) प्रशासनाने आता या रूटवर मिनीऐवजी मोठ्या बसेस चालवण्यास सुरुवात केली असून बसेसचे भाडेदेखील कमी करण्यात आले आहे, अशी माहिती शशांक विरकुड यांनी दिली. विरकुड यांनी यासंदर्भात आवाज उठवला होता. बेस्टकडून आता ६ रुपये ऐवजी ५ रुपये आणि १३ ऐवजी १० रुपये संबंधित प्रवासासाठी आकारले जाऊ लागले. यामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला असून मिनीऐवजी मोठ्या बसेस धावू लागल्याने अधिक प्रवाशांना स्वस्त दरात प्रवासाची सोय उपलब्ध झाली आहे.

उद्देश चांगला

मुंबईत मिनी वातानुकूलित बसेस खासगी कंत्राटदारांकडून चालवल्या जातात. मिनी बसेस चालवण्याच्या निर्णयाचे स्वागत तज्ञांकडून करण्यात आले कारण या बसेस चालवण्यामागचा उद्देश प्रवाशांना दिलासा देणे हा होता. मुंबई आणि उपनगरातील रेल्वे स्टेशनपासून कमी म्हणजेच साधारण ७-८ किमी अंतरापर्यंत या बसेस जलद गतीने मार्गक्रमण करत असल्याने प्रवाशांचा वेळ वाचतो. तसेच वातानुकूलित प्रवास असल्याने प्रवाशांना कमी दरात चांगली सुविधा उपलब्ध होऊ शकते, हा यामागचा उद्देश होता.

(हेही वाचा – Gujarat Drugs Connection : गुजरातमध्ये ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश : ५ हजार कोटींचे कोकेन जप्त ; काय आहे संपूर्ण प्रकार ?)

कंत्राटदाराची जबाबदारी

‘वेट भाडेतत्त्वा’खाली बसेस बेस्टच्या (BEST) ताफ्यात असल्या तरी त्या मिनी बसेस ‘बेस्ट’च्या मालकीच्या नाहीत. खाजगी कंत्राटदार उत्पादकाकडून या बसेसची खरेदी करण्यात आली आणि त्याचे संचालन आणि देखभालीची काळजी घेण्याची तसेच कर्मचारी भरती आणि त्यांच्या पगाराची जबाबदारी ही त्या कंत्राटदाराची आहे. दररोज बस फेऱ्या आणि किती किलोमीटर धावते त्यानुसार, पुरवल्या जाणाऱ्या सेवेसाठी ‘बेस्ट’कडून कंत्राटदाराला पैसे देण्यात येतात.

बेस्टच्या (BEST) ताफात गेल्या काही वर्षांत लक्षणीयरीत्या घट झाली आहे. २०१०-११ मधील ४,३८५ बस ताफा होता तो आता २०२४ मध्ये कमी होऊन १,०७० पर्यंत खाली आला आहे. खाजगी कंत्राटदारांद्वारे चालवल्या जाणाऱ्या कंत्राटी बस ताफ्यात सुमारे २,००० बसेस आहेत, असे सांगण्यात आले.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.