बेस्ट बसथांबे होणार Digital; बस येण्याच्या अपेक्षित वेळेसह मिळतील ‘या’ सेवा

बेस्ट बसचे वर्तमान स्थान ( Real Time Location) समजण्यासाठी तसेच बसचा मार्ग कळावा यासाठी बेस्ट उपक्रम लवकरच डिजिटल पब्लिक इन्फॉर्मेशन सिस्टम (DPI) म्हणजेच डिजिटल बस थांबे हा उपक्रम हाती घेणार आहे.

बेस्ट बसचे वर्तमान स्थान ( Real Time Location) समजण्यासाठी तसेच बसचा मार्ग कळावा यासाठी बेस्ट उपक्रम लवकरच डिजिटल पब्लिक इन्फॉर्मेशन सिस्टम (DPI) म्हणजेच डिजिटल बस थांबे हा उपक्रम हाती घेणार आहे. याद्वारे बस येण्याचा अपेक्षित कालावधी किती आहे याचीही माहिती प्रवाशांना देण्यात येणार आहे.

( हेही वाचा : मोबाईल फोनचा गैरवापर टाळण्यासाठी केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय! IMEI नंबरची करावी लागणार नोंदणी)

बस येण्याची अपेक्षित वेळ समजणार 

येत्या महिन्याभरात मरीन ड्राईव्ह आणि विमानतळ परिसरातील बसथांबे DIPS या प्रणाली अंतर्गत बदलले जातील. या बसथांब्यांवर वायफाय आणि चार्जिंगची सुविधा सुद्धा प्रवाशांना दिली जाणार आहे. तसेच थांब्यांवर आसन सुविधा वाढवल्या जातील. याअंतर्गत १०० बसथांब्यांचे नुतनीकरण करण्यात येणार आहे हे थांबे पारदर्शक असतील. या बसथांब्यांवर दोन डिस्प्ले युनिट असतील एकावर तुम्हाला जाहिराती दिसतील तर दुसरा डिस्प्ले तुम्हाला बस येण्याची अपेक्षित वेळ काय आहे याची माहिती देईल असे बेस्टचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्र यांनी सांगितले.

प्रवाशांना सुविधा 

आता जवळपास सर्व बसेसमध्ये जीपीएस यंत्रणा कार्यरत आहे या यंत्रणेला हे बसथांबे सुद्धा जोडले जातील. बसमार्गावरील उपलब्ध जागेनुसार बसथांब्यांचा आकार निश्चित केला जाईल हे या नव्या बसथांब्यांचे वैशिष्ट्य आहे. या थांब्यांवर प्रवाशांना चार्जिंग, वायफाय, बसचे ऑनलाईन लोकेशन, अपेक्षित वेळ याची माहिती मिळेल.

बसथांब्यांवर मिळतील या सुविधा

उत्तम आसन व्यवस्था, काचेचे छत, दिव्यांग प्रवाशांसाठी सांकेतिक ब्रेललिपी, सीसीटीव्ही कॅमेरा, वायफाय, चार्जिंग, सार्वजनिक शेअरिंग सायकल सेवा, पॅनिक बटण, वाचनालय किंवा ई-वाचनालय, प्रथमोपचार पेटी, हिरवे छत, व्यायाम करण्यासाठी उपकरणे

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here