मुंबईतील ‘बेस्ट’ Bus Stop सुशोभित होणार!

143

बेस्ट उपक्रमाने नेहमीच मुंबईवर जनतेचा प्राधान्याने विचार केला आहे. मुंबईकरांचा प्रवास सुलभ आणि सुखकर होण्याच्या दृष्टीने बेस्टने विविध उपक्रम सातत्याने राबविले आहेत. याचाच एक भाग म्हणून अलिकडे महालक्ष्मी रेसकोर्स येथे एका आगळ्यावेगळ्या बसथांब्याची रचना करण्यात आली होती.

( हेही वाचा : ‘बेस्ट’ने जारी केली मे महिन्यात गहाळ झालेल्या स्मार्टफोनची यादी)

१ हजार बसथांब्याचे काम लवकरच हाती घेण्यात येणार

या बसथांब्याला मुंबईकरांची पसंती मिळाल्यामुळे बेस्ट उपक्रमाने अशाचप्रकारे ३५० बसथांबे विकसित करण्याचे काम सुरु केले आहे. सदर कामासाठी लागणारा निधी महाराष्ट्र राज्याचे पर्यटन, पर्यावरण आणि राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांच्या जिल्हा नियोजन आणि विकास समितीच्या निधीतून उपलब्ध होणार आहे. याशिवाय आणखी १ हजार बसथांब्याचे काम लवकरच हाती घेण्यात येणार आहे. अशाप्रकारे येत्या ६ ते ८ महिन्याच्या कालावधीत मुंबतील जवळपास सर्वच बसावे पर्यावरणस्नेही आणि आकर्षक स्वरुपाचे असतील. जेणेकरून सदर बसथांब्यावर बसगाड्यांच्या प्रतीक्षेत थांबणाऱ्या प्रवाशांना एक सुखद अनुभव बेस्ट उपक्रमाद्वारे देण्याचा विचार आहे.

बेस्ट उपक्रमाचे आवाहन

मुंबईच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या या उपक्रमाच्या मदतीसाठी विविध कॉर्पोरेट हाऊसेस, बॅंका, उत्पादक संस्था, प्रसार माध्यम संस्था, तसेच अन्य व्यवसाय संस्थांनी त्यांच्या कार्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी फंडाद्वारे या नवीन बसथांब्यांच्या बांधकाम व देखरेखीसाठी सहकार्य करावे असे बेस्ट उपक्रमाद्वारे आवाहन करण्यात येत आहे. अशा व्यवसाय संस्थांना बेस्ट उपक्रमाद्वारे जाहिरात दरांमध्ये सवलत देण्यात येणार आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.