कोरोना काळात रेल्वे प्रवासावर निर्बंध असल्यामुळे मुंबईकर बेस्टकडे वळले. गेली अनेक वर्ष बेस्टच्या बसगाड्यांवर व बस थांब्यांच्या माध्यमातून विविध उपक्रमांच्या जाहिराती केल्या जातात. बहुतांश नागरिक बेस्टने प्रवास करत असल्यामुळे, याच माध्यमातून एचआयव्हीचे समुळ उच्चाटन करण्यासाठी जनजागृती करण्यात येणार आहे. एचआयव्हीविरोधातील जनजागृतीपर संदेश बसगाड्यांवर तसेच बस थांब्यांवर फलक लावण्यात येणार आहेत.
२०३० चे उद्दीष्ट्य
२०३० पर्यंत ‘एचआयव्ही’ मुक्त मुंबई हे उद्दीष्ट्य पालिकेसमोर असून यासाठी जनजागृती करण्यावर पालिका भर देणार आहे. बेस्ट प्रवाशांचा वाढता आकडा पाहता या माध्यमातून जनजागृती करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. २०२५ पर्यंत मुंबईतील एचआयव्हीबाधितांचा शोध घेणे, एचआयव्हीच्या ९५ टक्के रुग्णांवर त्वरित उपचार सुरू करून आजार आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करणे. प्रामुख्याने युवकांमध्ये जनजागृती करणे, अशी महत्वाची उद्दीष्ट्ये पालिकेसमोर आहेत. व या महत्वपूर्ण उपक्रमात पालिकेला बेस्टची साथ लाभणार आहे.
(हेही वाचा : रेल्वे गाड्यांचे नंबर बदलले, प्रवाशांचे धाबे दणाणले )
जनजागृतीपर संदेश
मुंबईतील ५० बेस्ट थांब्यांवर जाहिरात करण्यास उत्सुक असलेल्या संस्थांकडून प्रस्ताव स्वीकारण्यासाठी प्रचार कम्युनिकेशन या संस्थेची तर, बसगाड्यांवर संदेश लिहिण्यास इच्छुक अशा कंपन्यांचा प्रस्ताव साईनपोस्ट इंडिया स्वीकारणार आहे. संपूर्ण बसगाड्यांवर हे संदेश लावण्यात येतील.
Join Our WhatsApp Community