बेस्ट उपक्रमाने खास महिलांसाठी तेजस्विनी ही बससेवा सुरू केली. लॉकडाऊनच्या काळात सुद्धा तेजस्विनी मुंबईच्या रस्त्यांवरून सेवा देत होत्या. परंतु अलिकडे तेजस्विनी ही बस नक्की कोणासाठी हा सवाल सामान्य नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
( हेही वाचा : ‘बेस्ट’ बसमध्ये कंडक्टरशिवाय मिळणार तिकीट! )
बेस्ट उपक्रमाच्या ट्विटरवरही याविषयी दखल घेण्यात आली आहे. एका प्रवाशाने याचे ट्वीट करत बेस्टला टॅग केले आहे. या महिला विशेष बसमधून पुरूष प्रवासी प्रवास करत असलेले दिसून येत आहेत. कोविड काळात लॉकडाऊन असल्यामुळे सामान्य नागरिकांना रेल्वे प्रवासावर निर्बंध होते. त्यावेळी केवळ बेस्ट बसने मुंबईकरांना सेवा दिली, या कालावधीमध्ये उपक्रमावर अतिरिक्त ताण असल्यामुळे पुरूष प्रवाशांना सुद्धा या बसेसमधून प्रवास करण्याची मुभा देण्यात आली होती. परंतु अद्याप हे चित्र बदल्याचे दिसत नाही.
@myBESTBus #ladiesspecial pic.twitter.com/99BdkpjMfY
— 2114-Shailesh Varun (@ShaileshVarun_) April 11, 2022
महिला प्रवासी कमी असल्यामुळे मुभा
तेजस्विनी बसमध्ये महिला प्रवासी संख्या कमी असल्यामुळे रिकाम्या सोडाव्या लागतात. यामुळे उपक्रमाला मोठ्या प्रमाणात तोटा सहन करावा लागतो. म्हणूनच जागा असल्यास पुरूष प्रवाशांना प्रवास करण्याची परवानगी दिली जाते असे बेस्ट वाहकांनी स्पष्ट केले. परंतु या बसमधून प्रवास करण्यासाठी महिला प्रवाशांना प्राधान्य दिले जाते असेही त्यांनी सांगितले.
Join Our WhatsApp Community