आरे काॅलनी येथे झाडे तोडण्याचे काम सुरु असल्याने, तिथला रस्ता वाहतुकीसाठी बंद आहे. त्यामुळे बेस्ट बस मार्ग पर्यायी मार्गावर वळवण्यात आले आहेत. याबाबतची माहिती बेस्ट बस ट्रान्सपोर्टकडून ट्वीट करुन देण्यात आली आहे.
या मार्गावर वळवण्यात आली वाहतूक
आरे काॅलनीत झाडे तोडण्याचे काम सुरु असल्याने, बसमार्ग क्रमांक 460,489 हे जेव्हीएलआर मार्गाने पवईपर्यंत तसेच मार्ग 398,341, 478, 326 हे जेव्हीएलआर मार्गाने वळवले आहेत. मार्ग 342,451,452 हे मार्ग 343 मध्ये चालवण्यात येत आहेत.
https://twitter.com/myBESTBus/status/1551429558657638400?s=20&t=HKx3HKFguRYRt1BN-fpWXA
( हेही वाचा: ड्रॅगनशी संघर्ष सुरुच: लडाखमध्ये चिनी विमाने; भारतीय हवाई दलाची सावधगिरी )
‘आरे’ तील कारशेडचा मार्ग मोकळा
मुंबई मेट्रो रेल काॅर्पोरेशनकडून मेट्रोचे कारशेड आरे तच उभारणार, असे शिंदे- फडणवीस सरकारने स्पष्ट केले. आता त्यांनी त्या दिशेने पावले टाकण्यास सुरुवात केली आहे. वांद्रे- सीप्झ पर्यंतचा पहिला टप्पा 2021, तर बीकेसी ते कुलाबापर्यंतचा दुसरा टप्पा 2022 पर्यंत पूर्ण करण्याचे उद्धिष्ट ठरवण्यात आले आहे. मात्र, ठाकरे सरकारने कारशेड आरेऐवजी कांजूरमार्गला हलवण्याचा निर्णय घेतल्याने, या प्रकल्पाची गती मंदीवली. शिवया खर्चातही वाढ झाली. त्यामुळे हा प्रकल्प पुन्हा गती घेणार असल्याने, नव्या सरकारच्या निर्णयाचे स्वागत केले जात आहे.
Join Our WhatsApp Community