बेस्ट बसमध्ये वस्तू विसरलात? आता भरावे लागणार १४ टक्के शुल्क

141

अनेकदा बेस्ट बसमधून प्रवास करताना आपण आपल्या वस्तू विसरतो. या वस्तू बस वाहकामार्फत आगारात जमा केल्या जातात. परंतु आता तुम्हाला या विसरलेल्या वस्तूंसाठी १४ टक्के शुल्क आकारले जाणार आहे. बॅग, मोबाईल फोन यांसारख्या वस्तूंसाठी ५० रुपयांपर्यंत नाममात्र शुल्क आकारले जाईल.

( हेही वाचा : IND VS BAN : विराट कामगिरी! बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात कोहलीने मोडला ‘हा’ रेकॉर्ड )

वडाळा येथील बेस्टच्या आगारात नागरिकांच्या हरवलेल्या वस्तू सुरक्षित ठेवल्या जातात. एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, बसेसमधील हरवलेली रोकड/वस्तू जवळच्या डेपोमध्ये ठेवल्यानंतर तीन दिवसांच्या आत परत घेतली तर कोणतेही शुल्क न भरता दावा केला जाऊ शकतो, परंतु एकदा ती वस्तू वडाळा विभागात हस्तांतरित केल्यावर १४% शुल्क आकारले जाते.

बेस्टच्या ताज्या आकडेवारीनुसार १३३ सोन्याचे, चांदीचे आणि हिऱ्यांचे दागिने आणि रोख रक्कम (पाऊंड स्टर्लिंग, युरो आणि डॉलर्ससह) एकूण २७ लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या वस्तू महामारीच्या काळात बसेसमध्ये राहिल्या होत्या. यामधील ४३ टक्के रोख रक्कम आणि मोबाईल फोन नागरिकांनी परत घेतले आहेत. याशिवाय २०० हून अधिक ब्रँडेड घड्याळे, पेन ड्राइव्ह, पॉवर बँक, लॅपटॉप इ. आणि कपडे, भांडी, पिशव्या आणि चष्मा यांसारख्या ३ हजार २०० हून अधिक वस्तूंचा यात समावेश होता. २०२० ते २०२१ च्या पावसाळ्यात, जवळपास ७००० छत्र्या प्रवासी बेस्टबसमध्ये विसरले होते.

वडाळा आगारातील विभागामध्ये या सर्व वस्तू सुरक्षित ठेऊन जतन केल्या जातात. प्रवाशांच्या मालमत्तेची व्यवस्थित काळजी घेतली जाते असे बेस्टचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्र यांनी सांगितले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.