बेस्टच्या (BEST) बसगाड्यांची रचना पाहून हसावे कि रडावे, अशी अवस्था होईल अशा या बस गाड्या आहेत. विशेष म्हणजे बेस्टच्या वातानुकूलित बस (BEST) गाड्यांमध्ये अपंगांची कुचेष्ठा केली आहे. मजास डेपोची 308 क्रमांकाची ही बस कंत्राटदारांची ही बस आहे.
(हेही वाचा उबाठाचा Waqf Amendment Bill 2025 ला विरोध; बाळासाहेब असते तर असे भाषण केले असते का; श्रीकांत शिंदेंचा सवाल)
या बसमध्ये अपंगांसाठीची सीट चक्क चाकांवर केली आहे. त्यामुळे ही सीट उंचावर आहे. त्यामुळे अपंगांची सोय होण्याऐवजी गैरसोय अधिक होत आहे. बस (BEST) गाड्यांमधील या प्रकारच्या सीटमुळे या सीट अपंगांसाठी कमी सर्व सामान्य प्रवाशांच्या उपयोगाची अधिक होत आहे. त्यामुळे या सीट अपंगांसाठी असून नसल्यासारखी आहे. अपंगांसाठी सीटची रचना करताना त्यांना त्या सोयीस्कर असाव्यात अशी प्राथमिक अपेक्षा असते पण बेस्टची ही बस (BEST) पाहिल्यावर त्यातील अपंगांसाठीची केलेली ही सोय म्हणजे त्यांची केलेली ही कुचेष्ठा होय.
Join Our WhatsApp Community