BEST : आता बसमार्ग क्रमांक २१७ चे बसप्रवर्तन रात्री उशिरापर्यंत सुरू राहणार

156

‘आपली बेस्ट आपल्याचसाठी’ या प्रवासी संस्थेच्या सदस्यांनी शुक्रवार दिनांक २९ जुलै २०२२ रोजी बेस्ट उपक्रमाचे मुख्य वाहतूक अधिकारीरविंद्र शेट्टी यांची भेट घेऊन प्रशासनाने १ सप्टेंबर २०२२ पासून बंद / खंडित केलेले बसमार्ग पुनः सुरु करावेत अशी प्रमुख मागणी केली. याचसोबत काही ठराविक बसमर्गांचा नव्याने विस्तार करावा, तसेच निवडक बस मार्गांवरील बसफेऱ्यांच्या संख्येत वाढ करून प्रवाशांची गैरसोय दूर करावी, अशी सूचना देखील केली होती. बेस्ट उपक्रमातर्फे ह्या मागण्यांवर फेरविचार करून येत्या काळात टप्प्या टप्प्याने शक्य तितके बसमार्ग पूर्ववत केले जातील असे आश्वासन मुख्य वाहतूक अधिकारी रविंद्र शेट्टी यांनी संस्थेला तसेच प्रवासी प्रतिनिधींना दिले.

रात्री उशिरापर्यंत सुरू राहणार बससेवा

दादर रेल्वे स्थानक पूर्व, स्वामी नारायण मंदिर ते महर्षी दयानंद महाविद्यालय, परळ दरम्यान चालणारा बसमार्ग क्रमांक २१७ हा तसा नेहमी प्रवाशांनी गजबजलेला असतो. या मार्गावरून, भोईवाडा, टाटा रुग्णालय, रा. ए. स्मा. रुग्णालय या ठिकाणी सतत प्रवाशांची ये जा सुरु असते. बऱ्याचदा या बसमार्गांवर मीडी बसगाड्या चालविल्या जातात तसेच रात्री उशीरापर्यंत या मार्गांवर प्रवाशांची ये जा असून रात्री २१.३० नंतर बसप्रवर्तन उपलब्ध नाही. म्हणूनच ‘आपली बेस्ट आपल्याचसाठी’ या संस्थेतर्फे या बसमार्गांवर मीडी (टेम्पो ट्रॅव्हलर) बसगाड्या न चालवता बेस्ट ने स्वतःच्या मोठ्या (११ मिटर) बसगाड्या चालवाव्यात आणि रात्री उशीरा पर्यंत या बसमार्गावर वाढीव बसफेऱ्या आयोजित कराव्यात अशी सूचना केली गेली होती.

( हेही वाचा : Mumbai Local : प्रवाशांसाठी खुशखबर! AC लोकलचा प्रवास होणार आणखी स्वस्त?)

सदर सूचनेवर सकारात्मक प्रतिसाद देत बेस्ट उपक्रमातर्फे १ ऑगस्ट २०२२ पासून या बसमार्गांवर प्रत्येक १५ मिनिटांच्या अंतराने रात्री १२ वाजेपर्यंत वाढीव बसफेऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहेत. या बसफेरीची शेवटची बसगाडी दादर रेल्वे स्थानक पूर्व, येथून रात्री १२ वाजता तर महर्षी दयानंद विद्यालय, परळ येथून रात्री १२ वाजून १५ मिनिटांनी सुटेल याची कृपया सर्व प्रवाशांनी नोंद घ्यावी आणि जास्तीत जास्त संख्येने या बसफेरीचा लाभ घ्यावा असे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.