दररोज लाखो मुंबईकर बेस्ट बसने प्रवास करतात. सध्या मुंबईतील बेस्ट बस प्रवास हा सर्वात सोयीचा आणि स्वस्त आहे. बसचे कमीत-कमी तिकीटदर ५ रुपये असल्याने बेस्ट सेवेला प्रवाशांची पसंती मिळत आहे. बसेसची वारंवारता वाढवण्यासाठी तसेच उपक्रमाचे आर्थिक नुकसान भरून काढण्यासाठी बेस्टने भाडेकरारावरील बसचा ताफ्यात समावेश केला. या बसेसवर कंत्राटी कर्मचाऱ्यांना नियुक्त करण्यात आले असून या कर्मचाऱ्यांना अनुभव नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. सध्या या घटनेचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडिओमुळे प्रवाशांच्या सुरक्षेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
( हेही वाचा : वनडे मालिकेआधीच भारतीय संघाला मोठा फटका; ‘हा’ खेळाडू संघाबाहेर)
कंत्राटी ड्रायव्हर रस्ता विसरला
अणुशक्ती नगरला मार्गस्थ होत असताना कंत्राटी ड्रायव्हरने चुकून वाशीच्या रस्त्याला बस वळवली. त्यानंतर ड्रायव्हरला चुकीच्या रस्त्यावर आल्याचे लक्षात आल्यावर भर रस्त्यात बस वळवून उलट्या दिशेने आणली गेली. यामुळे रस्त्यात वाहतूककोंडी होऊन प्रवाशांची गैरसोय झाली. या गोंधळाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर सर्वत्र व्हायरल होत आहे. कंत्राटी कर्मचाऱ्यांना पुरेसा अनुभव नसताना सेवेत का सामावून घेतले असा सवाल सामान्य जनतेकडून केला जात आहे. तसेच यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. बेस्टचा प्रवास मुंबईत सर्वात सुरक्षित प्रवास समजला जातो त्यामुळे या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने नेटकऱ्यांनीही संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहे.
बेस्ट #कंत्राटी_ड्रायव्हर रस्ता विसरला; नंतर भर रस्त्यात बस वळवून उलट दिशेला आणली#bestbus @myBESTBus pic.twitter.com/jWjc11XHJg
— Hindusthan Post Marathi (@HindusthanPostM) January 9, 2023
यापूर्वी बेस्टच्या कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांनीही अनेकदा कंत्राटी सेवेबाबत प्रश्न उपस्थित केले होते. कंत्राटी कर्मचारी आमच्या एवढे जबाबदारीने कामे करत नाहीत असा दावा काही कायमस्वरुपी सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांकडून करण्यात येत आहे.
Join Our WhatsApp Community