रविवारी ३१ डिसेंबर २०२३ च्या रात्री नववर्ष स्वागतासाठी’ गेट वे ऑफ इंडिया, जुहू चौपाटी, गोराई बीच, मारवे बीच आणि मुंबईतील इतर समुद्र किनाऱ्यांवर रात्रीच्या वेळी येणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी बेस्ट (BEST Buses) उपक्रमाच्या वतीने विविध बसमार्गावर एकूण २५ जादा बसगाड्या रात्रीच्या वेळी सोडण्यात येणार आहेत. आवश्यकता भासल्यास अधिक प्रमाणात बसगाड्या सोडण्यात येतील असे बेस्ट उपक्रमाने स्पष्ट केले आहे.
‘नववर्ष स्वागतासाठी’ ३१ डिसेंबर २०२३ च्या रात्री मुंबईतील समुद्र किनाऱ्यांवर तसेच गेट वे ऑफ इंडियाच्या परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी होते. यासर्व ठिकाणी जमणाऱ्या जनतेच्या सोयीसाठी बेस्ट उपक्रमाच्या अतिरिक्त बसगाड्या सोडण्याचा निर्णय बेस्ट उपक्रमाच्या वतीने घेण्यात आला आहे.
(हेही वाचा-BMC : मुंबई महापालिका हद्दीत ९ जानेवारीपर्यंत शस्त्र बाळगण्यास बंदी)
प्रवाशांच्या मदतीसाठी बेस्ट उपक्रमातर्फे डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी चौक जुहू चौपाटी, गोराई बीच तसेच चर्चगेट स्थानक (पूर्व) व छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इ. ठिकाणी वाहतूक अधिकारी तसेच बसनिरीक्षकांची नेमणूक करण्यात येणार आहे. त्यामुळे ‘नववर्ष स्वागता’ च्या निमित्ताने बेस्ट उपक्रमाने उपलब्ध केलेल्या अतिरीक्त बससेवांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन बेस्ट उपक्रमाच्या वतीने करण्यात आले आहे.
Join Our WhatsApp Community