विमान प्रवाशांना आता २४ तास बेस्टची साथ

आंतरराष्ट्रीय विमानतळावरून दररोज अनेक प्रवासी प्रवास करतात. याच पार्श्वभूमीवर विमान प्रवाशांसाठी बेस्ट उपक्रमाकडून विशेष बस चालवल्या जातात. परंतु रात्री १२ वाजल्यानंतर प्रवासी व विमानतळावरील कर्मचाऱ्यांना त्यांच्या घरी पोहचण्यास वाहतुकीची मर्यादित साधने उपलब्ध असतात. म्हणूनच प्रवाशांची होणारी गैरसोय लक्षात घेता बेस्ट उपक्रमामार्फत मोठा निर्णय घेण्यात आला असून आता विमानतळावरील बससेवा २४ तास सुरू राहणार आहे.

बससेवा २४ तास सुरू

मार्ग – अंतर – तिकीट

  • आंतरराष्ट्रीय विमानतळ १ ते बॅकबे – १७५ रुपये
  • आंतरराष्ट्रीय विमानतळ २ ते वाशी – १५० रुपये
  • आंतरराष्ट्रीय विमानतळ ४ ते ठाणे – १५० रुपये

या निर्णयामुळे विमानप्रवाशांना नक्कीच दिलासा मिळाला आहे परंतु यामध्ये सामान ठेवण्याची सुविधा उपलब्ध असेल का असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे.

( हेही वाचा : फक्त २९ रुपयांमध्ये करा एसी लोकलने प्रवास! पहा नवे दरपत्रक… )

हात दाखवा बस थांबवा

बेस्ट उपक्रम रात्री उशिरा जरी सेवा देणार असेल तरीही प्रवासभाडे सर्वसाधारण आकारण्यात येणार आहे. तसेच हात दाखवा बस थांबवा या योजनेचा लाभ घेत प्रवासी बस थांबवू शकतात. अहोरात्र चालणा-या बससेवेचा लाभ अधिकाधिक प्रवाशांनी घ्यावा असे आवाहन बेस्ट उपक्रमाद्वारे करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here