बेस्टचा स्वस्त मस्त प्रवास! मासिक, त्रैमासिक बसपासमध्ये ५० टक्के बचत

मुंबईत बेस्ट उपक्रमाच्या बसने प्रवास करताना पूर्वी नागरिकांना एका स्थळापासून दुसऱ्या स्थळी जाण्यासाठी मासिक, त्रैमासिक बसपासची सुविधा होती परंतु प्रवाशांच्या सोयीसाठी बेस्ट उपक्रमाने बसफेऱ्यांच्या संख्येनुसार बसपास वितरण सेवा सुरू केली आहे. बसपासाचे दर हे बस प्रवासाच्या अंतरानुसार ठरविण्यात येत असल्याने प्रवासी निश्चित कालावधीत निश्चित केलेल्या बसफे-या पूर्ण करू शकतील. अशाप्रकारे फेरीवर आधारित बसपास प्रवाशांना आर्थिकदृष्ट्या फायद्याचे होते आणि त्यामध्ये विविध ठिकाणी प्रवास करता येतो असे उपक्रमाने स्पष्ट केले आहे.

( हेही वाचा : बेस्ट कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त सानुग्रह अनुदान मिळणार?)

नव्या बस पासचे फायदे पुढीलप्रमाणे आहेत…

१. पाच किलोमीटरपर्यंतच्या दैनंदिन प्रवासासाठी दहा रुपये तिकीट दर आहे. (रुपये ५ प्रति फेरीप्रमाणे ये – जा करणाऱ्या प्रवासासाठी). १०० फे-यांसाठी २८ दिवसांसाठीच्या बसपासचा दर रु २४९/- असल्याने त्याचा प्रतिफेरी दर रु.२५० इतका होतो. म्हणजेच प्रत्येकी दोन फे-यांकरिता रु ५/- लागत असल्याने या दैनंदिन प्रवासभाडयात ५०% बचत होते.

२. दहा किलोमीटरपर्यंतच्या दैनंदिन प्रवासासाठी वीस रुपये तिकीट दर आहे (रुपये १० प्रति फेरीप्रमाणे ये-जा करणा-या प्रवासासाठी) १०० फे-यांसाठी २८ दिवसांसाठीच्या बसपासचा दर रु.४९९/- असल्याने त्याचा प्रतिफेरी दर रु.४.९९ इतका होतो. अशा प्रकारे प्रत्येकी दोन फे-यांकरिता रु.१०/- लागत असल्याने या दैनंदिन प्रवासभाडयात ५०% बचत होते.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here