मुंबईत बेस्ट बसचे लाईव्ह लोकेशन ट्रॅक करणे, तिकिट काढणे, पास काढणे चलो अॅपमुळे अगदीच सोयीस्कर झाले आहे. बेस्टचा प्रवास सोयीस्कर व्हावा यासाठी उपक्रमाने चलो अॅपचे अनावरण केले होते. याअंतर्गत आता बेस्टने सुपर सेव्हर योजना लॉंच करण्यात येत आहेत. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी बेस्ट प्रशासनामार्फत सवलतीच्या दरात तिकीट विक्री केली जाते.
( हेही वाचा : FIFA वर्ल्डकप २०२२ : जगभरात फुटबॉल फिव्हर; विश्वचषकाचे संपूर्ण वेळापत्रक एका क्लिकवर!)
चलो अॅपचा वापर करणाऱ्या युजर्सला फायदेशीर
बेस्टकडून ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आणि चलो अॅपचा वापर वाढवण्यासाठी ९ रुपयात ५ फेऱ्यांचा प्रवास ही योजना कायमस्वरूपी करण्यात आली आहे. परंतु या योजनेचा लाभ फक्त नव्या म्हणजेच प्रथम युजर्स घेता येणार आहे. या सुपर सेव्हर योजनेविषयी संपूर्ण माहिती खालीलप्रमाणे…
फक्त ९ रुपयात ७ दिवसात ५ फेऱ्यांचा प्रवास
- चलो अॅप ओपन केल्यावर तुम्हाला ही Super Saver Offer दिसेल.
- या सुपर सेव्हर ऑफरद्वारे तुम्हाला ७ दिवस, बसच्या ५ फेऱ्यांच्या प्रवासासाठी फक्त ९ रुपया तिकीट दर भरावे लागतील.
- ही ऑफरचा लाभ फक्त प्रथम/नवे युजर्स घेऊ शकतात, यासाठी तुम्हाला चलो अॅपवर लॉगिन प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. तुम्ही याआधी चलो अॅपमधून कोणत्याही योजनेचा लाभ घेतला असेल तर तुम्हाला ही सुविधा उपलब्ध नसेल.
- बसमध्ये प्रवास करताना तुम्ही हे तिकीट Activate करून शकता.
- संबंधित कंडक्टरला तुम्हाला केवळ उतरण्याचे ठिकाण सांगावे लागेल, स्कॅन केल्यावर तुम्हाला तुमच्या मोबाईल स्क्रिनवर ई-तिकीट दिसेल.
- फक्त चलो अॅपचा वापर करणारे प्रवासीच या योजनेचा लाभ घेऊ शकतात.