स्वस्त मस्त BEST! मुंबईत फक्त १ रुपयात बस प्रवास

109

मुंबईत बेस्ट बसचे लाईव्ह लोकेशन ट्रॅक करणे, तिकिट काढणे, पास काढणे चलो अ‍ॅपमुळे अगदीच सोयीस्कर झाले आहे. बेस्टचा प्रवास सोयीस्कर व्हावा यासाठी उपक्रमाने चलो अ‍ॅपचे अनावरण केले होते. याअंतर्गत आता बेस्टने सुपर सेव्हर योजना लॉंच केल्या आहेत. चलो अ‍ॅपचा वापर केल्यामुळे आता पैशांचीही बचत होणार आहे. या अ‍ॅपच्या नव्या योजनेनुसार मुंबईकरांना फक्त १ रुपयात बस प्रवास करता येईल. या सुपर सेव्हर योजनेविषयी संपूर्ण माहिती खालीलप्रमाणे…

( हेही वाचा : ‘बेस्ट’च्या आणखी १०० गाड्यांमध्ये प्रवाशांना मिळणार ‘टॅप इन टॅप आउट’ सुविधा! )

१ रुपयात प्रवास 

  • चलो अ‍ॅप ओपन केल्यावर तुम्हाला ही Super Saver Offer दिसेल.
  • या सुपर सेव्हर ऑफरद्वारे तुम्हाला ७ दिवस, बसच्या ५ फेऱ्यांच्या प्रवासासाठी फक्त १ रुपया तिकीट दर भरावे लागतील.
  • ही ऑफर फक्त मर्यादित कालावधीसाठी अस्तित्वात आहे. जर रविवार २४ जुलैला तुम्ही ही सेवा १ रुपया शुल्क भरून सुरू केली तर, ३० जुलैपर्यंत बसच्या ५ फेऱ्यांचा तुम्ही मोफत लाभ घेऊ शकता.
  • बसमध्ये प्रवास करताना तुम्ही हे तिकीट Activate करून शकता.
  • संबंधित कंडक्टरला तुम्हाला केवळ उतरण्याचे ठिकाण सांगावे लागेल, स्कॅन केल्यावर तुम्हाला तुमच्या मोबाईल स्क्रिनवर ई-तिकीट दिसेल.
  • फक्त चलो अ‍ॅपचा वापर करणारे प्रवासीच या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

New Project 17 2

बेस्टच्या इतर सुपर सेव्हर योजना!

प्रवाशांनी दैनंदिन तिकीट किती रुपये असते त्या पर्यायाची निवड करावी, त्यानुसार सुपर सेव्हर प्लॅन उपलब्ध होतील
उदाहरणार्थ,

  • ५ रुपये तिकिट- ५० सहली (महिना) १९९ रुपये
  • १० रुपये तिकिट- ५० सहली (महिना) ३९९ रुपये
  • ५ रुपये तिकिट- १०० सहली(महिना) ७४९ रुपये

– स्पेशल पास

  • रिपोर्टर/ पत्रकार – ३९५ रुपये
  • दिव्यांग व्यक्ती – ३ वर्षे मोफत प्रवास
  • शासकिय सेवानिवृत्त व्यक्ती- ९०० रुपये

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.