बेस्ट कंत्राटी कामगारांचे पुन्हा ‘काम बंद’ आंदोलन

मातेश्वरी अर्बन ट्रान्सपोर्ट प्रायव्हेट लिमिटेड या खासगी कंत्राटदाराच्या बसगाड्यांच्या चालकांनी संप पुकारला आहे. त्यामुळे रविवारी वडाळा आगारातून एम्.पी. ग्रूपच्या नियोजित ४८ बसगाड्या बसचालक कामावर न आल्यामुळे चालू शकल्या नाहीत. परंतु, बेस्ट प्रशासनाने प्रवाशांच्या सोयीसाठी २९ बसगाड्या चालवल्या. तसेच, सोमवारी वडाळा आगारातून एम्.पी. ग्रूपच्या नियोजित ६३ बसगाड्या बसचालक कामावर न आल्यामुळे चालू शकल्या नाही. परंतु, बेस्ट प्रशासनाने प्रवाशांच्या सोयीसाठी २७ बसगाड्या चालवल्या.

याआधी देखील आंदोलन झाले होते, पण तेव्हा समस्या सोडवल्या जातील असं आश्वासित केलं होतं. पण, तरीही समस्या न सोडवल्यामुळे तसेच वेळेत वेतन प्राप्त न  झाल्याने या कंत्राटी कर्मचा-यांनी आंदोलन पुकारले आहे.

त्याचप्रमाणे बेस्ट प्रशासनाने सदर कंत्राटदाराला या बाबतीत तातडीने लक्ष घालून त्वरित तोडगा काढण्यासाठी सांगितले आहे- बेस्ट प्रशासन

 

( हेही वाचा: पुस्तकांचीही झाली होती फाळणी; त्यावेळचा ‘हा’ जगप्रसिद्ध फोटो पाहिलात का? )

काय आहेत मागण्या

बेस्टच्या ताफ्यात स्वमालकीच्या आणि भाडेतत्वावरील बसगाड्यांचा समावेश आहे. बेस्ट उपक्रमाने नियुक्त केलेल्या सहा कंत्राटदारांनी भाडेतत्वारील बसगाड्या उपलब्ध केल्या असून, त्या विविध मार्गांवर चालवण्यात येत आहेत. भाडेतत्वावरील बसगाडीवर संबंधित कंपनीकडूनच कंत्राटी चालकाची नियुक्ती करण्यात आली आहे. गेल्या काही महिन्यांपासून या चालकांना वेळेवर वेतन मिळालेले नाही. तसेच भविष्य निर्वाह निधीची रक्कमही त्यांच्या खात्यावर जमा झालेली नाही. वडाळा आगारात एम.पी. ग्रुपतर्फे भाडेतत्वावर बसचा पुरवठा करण्यात आला असून, या कंत्राटदाराने नियुक्त केलेले कंत्राटी चालक त्या चालवत आहेत. वेळेवर वेतन मिळावे आणि भविष्य निर्वाह निधीची रक्कम खात्यात जमा व्हावी या मागणीसाठी कंत्राटी चालकांनी गेल्या काही महिन्यांपासून वारंवार काम बंद आंदोलन केले आहे. चालकांनी रविवारीही याच प्रश्नावरुन आंदोलन केले. त्यामुळे ४८ बसगाड्या आगारातून बाहेर पडू शकल्या नाहीत.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here