मुंबईत बेस्ट उपक्रमाचे २७ आगार असून या सर्व आगारांचा लवकरच कायापालट करण्यात येणार आहे. बस आगारातील जागेचा विकास करण्यात येणार असून, मॉलच्या धर्तीवर कमर्शियल हब बनवण्यात येणार आहे. याचा आराखडा तयार करण्यासाठी आयएफसी कंपनीची सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
( हेही वाचा : फक्त २०२३ रुपयांमध्ये करा विमान प्रवास! बुकिंगसाठी ‘ही’ आहे शेवटची तारीख)
वर्ल्ड बॅंकेकडून मदतीचा आधार
बस आगारांचा विकास करण्यासाठी वर्ल्ड बॅंकेकडून कर्ज घेण्यात येणार असून याबाबत चर्चा सुरू असल्याची माहिती बेस्ट उपक्रमाचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्र यांनी दिली आहे. महागाई, डिझेल-सीएनजीचे वाढते दर यामुळे बेस्ट उपक्रमाचे आर्थिक गणित बिघडले आहे. आर्थिक कोंडी फोडण्यासाठी बेस्ट उपक्रमाच्या २७ बस आगारांचा व्यावसायिक वापर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी सल्लागार म्हणून आयएफसी कंपनीची नियुक्ती करण्यात आली आहे.
निवासी इमारती कोणत्या भागात बांधाव्यात, कोणत्या बस आगाराचा वापर कमर्शियल वापरासाठी करू शकतो या सगळ्याच्या अभ्यास करण्यात येणार आहे. हा प्रकल्प राबवण्यासाठी येणारा खर्च करण्यासाठी वर्ल्ड बॅंकेकडून कर्ज घेण्यात येणार आहे. याविषयी वर्ल्ड बॅंकेसह चर्चा सुरू असल्याची माहिती बेस्टच्या महाव्यवस्थापकांनी दिली आहे. सध्या मुंबईत बेस्ट उपक्रमाच्या मालकीचे २७ आगार आहेत. यामध्ये अनेक खासगी वाहनांना पार्किंग सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तरीही बस आगारातील जागेचे क्षेत्रफळ लक्षात घेता या ठिकाणी निवासी इमारत व कमर्शियल हब बनवण्याबाबत सल्लागाराची नियुक्ती केल्याची माहिची उपक्रमाने दिली आहे.
Join Our WhatsApp Community