‘बेस्ट’च्या डबलडेकर बसमधून फक्त ६ रुपयांमध्ये प्रवास! असा असेल मार्ग

173

मुंबईत २१ फेब्रुवारीपासून पहिली डबलडेकर इलेक्ट्रिक एसी बस धावणार आहे. या बसचा मार्ग सीएसएमटी ते एनसीपी असा असणार आहे. यासाठी प्रवाशांना तिकीट दर ५ किलोमीटरसाठी फक्त ६ रुपये असणार आहे. बेस्टच्या ताफ्यातील ही देशातील पहिली डबलडेकर एसी बस असून या महिन्याच्या अखेरपर्यंत आणखी ५ डबलडेकर बसेस ताफ्यात सामील होणार आहेत. अशी माहिती बेस्ट उपक्रमाच्या व्यवस्थापनाकडून सांगण्यात आली आहे.

( हेही वाचा : माथेरानच्या ‘राणी’ला पर्यटकांची पसंती! ५ महिन्यांमध्ये २९ लाखांचे उत्पन्न)

बेस्ट उपक्रमामध्ये ४५ वातानुकूलित बस आहेत यातून ५४ ते ६० प्रवासी एकावेळी प्रवास करू शकतात परंतु या डबलडेकर बसमधून एकाचवेळी ७६ प्रवासी प्रवास करू शकणार आहेत, तर १५ ते २० प्रवासी उभ्याने प्रवास करू शकतात. यामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे, चालक-वाहन यांच्यातील संपर्कासाठी विशेष व्यवस्था करण्यात आलेली आहे. तसेच दोन्ही बाजूला स्वयंचलित दरवाजे अशी या बसची वैशिष्ट्ये आहेत, अशा एकूण २०० बसेस मुंबईकरांच्या सेवेत येणार आहेत.

सहा रुपयांमध्ये प्रवास

या डबलडेकर एसी बसमधून मुंबईकरांना केवळ ६ रुपयांमध्ये प्रवास करता येणार आहे. ५ किलोमीटरसाठी फक्त ६ रुपये तिकिटदर आकारण्यात येणार आहे. त्यामुळे निश्चितच या डबलडेकर बसला प्रवाशांची पसंती मिळणार आहे.

नव्या बसची वैशिष्ट्य

  • प्रत्येक नव्या बसमध्ये दोन जिने असतील, जुन्या बसमध्ये फक्त एकच जिना होता.
  • नव्या बसमध्ये Digital तिकीटांची सोय असेल.
  • प्रवाशांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे लावले जातील.
  • नवीन दुमजली बस भारत-६ श्रेणीतील असून या बसमध्ये स्वयंचलित गिअर आहे.
  • बस थांब्याची माहिती देण्यासाठी बसमध्ये इलेक्ट्रॉनिक बोर्ड असतील.
  • दोन स्वयंचलित दरवाजे असतील आणि ते उघडबंद करण्याचे नियंत्रण बसचालकाकडे असेल.
  • प्रवासी वाहून नेण्याची क्षमता अधिक
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.