बेस्टच्या डबल डेकर बसची मुंबईकरांना प्रतीक्षा; मकरसंक्रांतीचा मुहूर्त हुकला, आता फेब्रुवारीत होणार आगमन

90

मकरसंक्रांतीला बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यात दुमजली बसचा समावेश करण्यात येईल अशी माहिती २०२२ मध्ये बेस्ट उपक्रमाकडून देण्यात आली होती. परंतु अजूनही बस चाचण्यांच्या फेऱ्यामध्येच अडकली असून दुमजली बस फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात दाखल होणार आहे.

( हेही वाचा : जी-20 देशांनी घेतलेल्या निर्णयांना जागतिक पातळीवर महत्व! विकसनशील राष्ट्रांना मोठा फायदा)

सप्टेंबर – ऑक्टोबर महिन्याच्या दरम्यान बेस्टच्या दुमजली इलेक्ट्रिक एसी बस मुंबईकरांच्या सेवेत समाविष्ट होती असे सांगण्यात आले होते परंतु आता २०२३ चा जानेवारी महिना उजाडला तरीही मुंबईकरांना दुमजली बसची प्रतीक्षा आहे. प्रवाशांच्या सेवेत येण्यापूर्वी बस चाचण्यांमध्ये अडकली आहे. सध्या उपक्रमाकडे ४५ विनावातानुकूलित दुमजली बस आहेत. एकमजली बसमधून ५४ ते ६० प्रवासी प्रवास करू शकतात तर दुमजली बसची प्रवासी आसन क्षमता ७८ आहे. प्रवासी वाहून नेण्याची क्षमता अधिक असल्याने उपक्रमाने दुमजली बसेस सेवेत आणण्याचा निर्णय घेतला आहे.

आता या इलेक्ट्रिक दुमजली बसेस फेब्रुवारीत बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यात समाविष्ट होणार असल्याचे म्हटले जात आहे. एकूण ९०० वातानुकूलित बस बेस्टच्या ताफ्यात दाखल केल्या जाणार आहेत. यामधील काही बसचे छत काढून त्यांचे ओपन डेकमध्ये रुपांतर करण्यात येणार असल्याचेही बेस्टने स्पष्ट केले आहे.

नव्या बसची वैशिष्ट्य

  1. प्रत्येक नव्या बसमध्ये दोन जिने असतील, जुन्या बसमध्ये फक्त एकच जिना होता.
  2. नव्या बसमध्ये Digital तिकीटांची सोय असेल.
  3. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे लावले जातील.
  4. नवीन दुमजली बस भारत-६ श्रेणीतील असून या बसमध्ये स्वयंचलित गिअर आहे.
  5. बस थांब्याची माहिती देण्यासाठी बसमध्ये इलेक्ट्रॉनिक बोर्ड असतील.
  6. दोन स्वयंचलित दरवाजे असतील आणि ते उघडबंद करण्याचे नियंत्रण बसचालकाकडे असेल.
  7. प्रवासी वाहून नेण्याची क्षमता अधिक
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.