मुंबईतील वाहतूककोंडीपासून आणि रिक्षा-टॅक्सीच्या वाढत्या दरांपासून नागरिकांची सुटका करण्यासाठी बेस्ट उपक्रम मुंबईत लवकरच इलेक्ट्रिक टॅक्सी सेवा सुरू करण्याच्या विचारात आहे. यासाठी प्रशासनाने कंत्राटी कंपन्यांकडून निविदा मागवल्या आहेत. या मार्फत मुंबईच्या कानाकोपऱ्यात बेस्टची सेवा मिळणार आहे. या एजन्सी कंपन्या इलेक्ट्रिक कॅब्ससह इंधन आणि चालक सेवा सुद्धा प्रदान करणार आहेत. तसेच या प्रत्येक इलेक्ट्रिक टॅक्सीवर बेस्टचा लोगो असणार आहे.
( हेही वाचा : ‘बेस्ट’ म्हणतेय…मुंबईत रिक्षा-टॅक्सी प्रवास महागल्यावर बस ‘BEST’ आहे!
बेस्टच्या कॅबने प्रवास
तुम्ही एखाद्या ठिकाणी जाण्यासाठी बसचा वापर केला आणि स्टॉपपासून पुढे बससेवा उपलब्ध नसेल किंवा अनेकवेळा काही मार्गावर बस धावत नाही अशा सर्व मार्गांवर बेस्टच्या कॅबने पुढचा प्रवास करता येणार आहे. तसेच घरापासून बसस्टॉपपर्यंत येण्यासाठी सुद्धा तुम्ही या कॅबचा वापर करू शकता.
ओला-उबेरपेक्षा दर कमी असणार
या कॅबचे बुकिंग तुम्ही ऑनलाईन पद्धतीने चलो अॅपच्या माध्यमातून करू शकता. या कॅबचे पैसै तुम्हाला ऑनलाईन भरता येतील. ही ई-कॅब तुम्हाला ओला-उबेरप्रमाणेच चलो अॅपच्या माध्यामातून बुक करता येईल. या ई-कॅबचे(इलेक्ट्रिक टॅक्सी) दर ओला आणि उबेर टॅक्सीपेक्षा कमी असतील. त्यामुळे सामान्य प्रवासी सुद्धा या सेवेचा लाभ घेऊ शकतात.
पर्यावरणपूरक ई-कॅब (इलेक्ट्रिक टॅक्सी)
या इलेक्ट्रिक टॅक्सी पर्यावरणपूरक असून यामुळे ध्वनी प्रदूषण सुद्धा होणार नाही. कंपनीची नियुक्ती करण्यासाठी लवकरच लिलाव घेऊ ही युनिक कॉन्सेप्ट ठरेल असे बेस्टचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्र यांनी स्पष्ट केले आहे.
Join Our WhatsApp Community