मुंबईत बेस्ट प्रवाशांच्या सेवेत जवळपास ३ हजार ५०० गाड्या धावत आहेत. कोरोना काळात सुद्धा बेस्ट कर्मचाऱ्यांनी मुंबईकरांना सेवा दिली. गेली काही वर्ष शासनाने विविध विभागातील कर्मचाऱ्यांना अल्पदरात बाजारमूल्य आकारून घरे देण्याचे धोरण निश्चित केले आहे, तसेच गिरणी कामगार, पोलीस कर्मचाऱ्यांना मालकी हक्काची घरे देण्यात येत आहेत. बेस्ट विद्युतपुरवठा आणि परिवहन उपक्रम कर्मचाऱ्यांना गिरणी कामगारांप्रमाणे हक्काचे घर मिळावे अशी मागणी करण्यात आली आहे.
( हेही वाचा : राज्यात जुनी पेन्शन लागू होणार की नाही? देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितले…)
बेस्ट कर्मचाऱ्यांना हक्काचे घर मोफत न देता बाजारमूल्य आकारून द्यावे असे निवेदन बेस्ट वसाहतीमधील कुटुंबियांनी नियोजित गृहनिर्माण संस्थेमार्फत करण्यात आले आहे. हा महत्त्वाकांक्षी निर्णय घेऊन हजारो कर्मचारी मुंबईबाहेर स्थलांतरित होऊ नये यासाठी सकारात्मक पाऊल प्रशासनाने उचलावे अशी मागणी बेस्ट वसाहतीतील कर्मचाऱ्यांकडून करण्यात येत आहे.
मालकी घरांसाठी मागणी
१५ जुलै १९२६ पासून बेस्ट बस मुंबईत सुरू झाली आणि १९४७ मध्ये मुंबई महापालिकेच्या अखत्यारित आली. बेस्टमध्ये कालानुरूप असंख्य बदल झाले असून आता बेस्टच्या ताफ्यात नव्या इलेक्ट्रिक बसेस सुद्धा दाखल झाल्या आहेत. बेस्टमध्ये काम करणाऱ्या काही कर्मचाऱ्यांची ही तिसरी पिढी आहे तसेच मुंबईच्या सर्व भागात, कानाकोपऱ्यात बेस्ट सेवा आहे त्यामुळे अशा सर्व कर्मचाऱ्यांसाठी प्रशासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा आणि वसाहतीमध्ये मालकी हक्काचे घर द्यावे अशी मागणी कर्मचाऱ्यांकडून करण्यात येत आहे.
Join Our WhatsApp Community