…अखेर ‘बेस्ट’ कर्मचाऱ्यांना मिळणार 73 कोटींचा कोविड भत्ता!

कोरोना काळात सामान्य लोकांना रेल्वे प्रवासाची मुभा नव्हती यामुळे या काळात मुंबईकरांकडे बेस्टने प्रवास करण्याशिवाय पर्याय नव्हता. या काळात निरंतर सेवा दिलेले बेस्ट उपक्रमातील चालक, वाहकांसह विद्युत, अभियंता विभागांतील शेकडो कर्मचारी कोविड भत्त्यापासून वंचित राहिले होते.

( हेही वाचा : बेस्टच्या सामायिक कार्डकडे प्रवाशांनी फिरवली पाठ )

परंतु आता लवकरच बेस्ट कर्मचाऱ्यांना खुशखबर मिळणार असून सोमवार दिनांक 25 एप्रिल 22 रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शुभहस्ते कुलाबा येथे बेस्टच्या डिजिटल कार्ड सेवेचा लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला आहे . यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते 2022 पर्यंत सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना ग्रजुएटी प्रदान करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे 73 कोटींचा प्रलंबित कोविड भत्ता, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या रजेचे पैसे, 2017 पासून प्रलंबित असलेले एल टी ए चे पैसे देखील प्रदान करण्यात येणार आहेत.

बेस्ट कामगारांच्या वतीने जाहीर आभार

याकरता आवश्यक असणारा सुमारे 850 कोटीचा निधी मुंबई महानगर पालिकेकडून तात्काळ बेस्टच्या तिजोरी मध्ये जमा करण्यात येईल. यासाठी बेस्ट कामगार सेनेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, सुभाष देसाई, महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल, बेस्टचे अध्यक्ष आशिष चेंबूरकर, महाव्यवस्थापक लोकेश चंद्र या सर्वांचे बेस्ट कामगारांच्या वतीने जाहीर आभार मानले.

बेस्ट उपक्रमाने दररोज ३०० रुपये कोविड भत्ता देण्यास मंजुरी दिली होती. तशी मागणी कर्मचाऱ्यांकडून करण्यात आली होती. जूनपर्यंत हा भत्ता कर्मचाऱ्यांना मिळाला. त्यानंतर भत्ता देणे बंद झाले. वारंवार मागणी करुनही कर्मचारी कोविड भत्त्यापासून वंचित होते अखेर बेस्ट कर्मचाऱ्यांना त्यांच्या हक्काचा कोविड भत्ता लवकरच प्राप्त होणार आहे.

एक प्रतिक्रिया

  1. थकबाकी मिळणार चांगली बातमी आहे पण कोविड भत्ता हा सर्व खात्यामधील कर्मचाऱ्यांना मिळाला नाही. कोविड काळात २३ मार्च हजर रोटेशन प्रमाणे हजर होते. जी खाती अत्यावश्यक सेवे मध्ये कार्यरत होती तरीही.
    त्यापेक्षा आम्हाला असे म्हणावेसे वाटते की प्रत्येकास जो हजर् आहे त्या कामगारला कोविड भत्ता बेस्ट प्रशासनाने द्यावा, भेदभाव नसावा ही विनंती.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here