BEST : बेस्ट उपक्रमाची सुरक्षा अनामतच्या नावाखाली लूट, वीज ग्राहकांना पाठवल्या नोटिसा

429
BEST : बेस्ट उपक्रमाची सुरक्षा अनामतच्या नावाखाली लूट, वीज ग्राहकांना पाठवल्या नोटिसा

आधीच बेस्टच्या विद्युत विभागाच्या कारभाराला मुंबईकर कंटाळलेले असून अनेकदा वीज पुरवठा खंडित होत असल्याने नागरिक त्रस्त आहेत.त्यातच आता बेस्टच्या वीज ग्राहकांकडून सुरक्षा अनामतच्या अर्थात सिक्युरिटी डिपॉझिटच्या नावाखाली बेस्टने नोटिसा पाठवण्यास सुरुवात केली होती. ही मुंबई शहरातील नागरिकांची मोठी लूट असून ही लूट आम्ही होऊ देणार नाही, असा इशारा अनेक वर्षे बेस्ट समितीचे सदस्य राहिलेले आणि महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी दिला आहे. (BEST)

रवी राजा यांनी एक्सवर प्रतिक्रिया व्यक्त करत बेस्ट प्रशासनाच्यावतीने पाठवण्यात आलेल्या नोटिसांचा तीव्र विरोध केला आहे. राजा यांनी एक्सवर असे नमुद केले आहे की, बेस्ट वीज वापरणाऱ्या ग्राहकांना अधिकचे सिक्युरिटी डिपॉजिट मागणाऱ्या नोटिसा बेस्ट प्रशासनाने पाठवायला सुरुवात केली आहे. मुंबईकरांची लूट करण्याचा हा एक नवीन प्रकार बेस्ट प्रशासनाने शोधून काढला आहे. एमईआरसी इलेक्ट्रीक सप्लाय कोड अँड एसओपी रेग्युलेशन्स २०२१ च्या (MERC Electricity Supply Code and SoP Regulations 2021) अंतर्गत हे अधिकचं सिक्युरिटी डिपॉझिट मागितले जात आहे. (BEST)

(हेही वाचा – Nashik-Mumbai Highway च्या दुरुस्तीसाठी नाशिककर उतरणार रस्त्यावर)

नागरिकांची लूट होऊ देणार 

मुळात बेस्टच्या वीज ग्राहकांनी जर या आधीच सिक्युरिटी डिपॉझिट भरले आहे, तर मग आत्ता अधिकचे डिपॉझिट का मागितलं जात आहे? आणि ते सुद्धा २०२१ च्या तरतुदीची आठवण ३ वर्षांनी बेस्ट उपक्रमालाला का होत आहे, असा सवाल रवी राजा यांनी केला. त्यामुळे बेस्टला त्यांच्या परिवहन विभागात होत असलेला प्रचंड तोटा कुठूनतरी भरून काढायचा आहे, म्हणून वीज ग्राहकांकडून अतिरिक्त सुरक्षा अनामतच्या नावाखाली पैसे वसूल करण्याचा प्रयत्न असल्याचाही आरोप रवी राजा यांनी केला. (BEST)

बेस्टच्या परिवहन विभागाला महापालिकेने अनेकवेळा मोठ्या प्रमाणवर मदत करूनही त्यांना त्यांना त्यांची तुट कमी करता आलेली नाही. याचे कारण म्हणजे मोठ्या प्रमाणवर सुरु असलेला बेस्ट प्रशासनाचा मनमानीचा कारभार, असे त्यांनी म्हटले आहे. असाच प्रयत्न बेस्ट प्रशासनाने २०१२ मध्ये केला होता. ज्यावर सर्वोच्च न्यायालयाने ताशेरे ओढत यावर बेस्ट प्रशासनाला सुनावले होते. त्यामुळे हा प्रकार गंभीर असून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याप्रकरणी लक्ष घालावे अशी विनंती त्यांनी केली आहे. मुंबईकरांची लूट करण्याचा हा प्रकार जो बेस्ट प्रशासनाने सुरु केला आहे, याविरोधात आम्ही आवाज उठवून, आधीच बेस्ट इलेक्ट्रिसिटीच्या कारभाराला कंटाळलेल्या आणि अनेकदा वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांची लूट आम्ही होऊ देणार नाही, असे रवी राजा यांनी म्हटले आहे. (BEST)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.