मुंबईकरांची लाईफलाइन असणाऱ्या बेस्ट बसच्या ताफ्यात इलेक्ट्रिक एसी डबलडेकरचा समावेश करण्यात आला आहे. केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते मुंबईत एका कार्यक्रमात डबलडेकर बसचे लोकार्पण करण्यात आले. प्रदूषण मुक्त प्रवासासाठी बेस्टच्या ताफ्यात इलेक्ट्रिक बस दाखल केल्या जात आहे असे गडकरी म्हणाले.
( हेही वाचा : मंत्री गुलाबराव पाटलांना उपसभापतींनी झापले, म्हणाल्या…)
मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये बेस्टच्या ताफ्यातील इलेक्ट्रिक बसचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी बेस्टचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्र आणि इतर अधिकारी उपस्थित होते. इलेक्ट्रिक बसने प्रवास करणे स्वस्त आहे. तसेच १८ ऑगस्टला संध्याकाळी एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या बसचे लोकार्पण करण्यात येणार आहे. सप्टेंबर महिन्यापासून एसी डबलडेकर बस मुंबईकरांच्या सेवेत रूजू होईल.
किती असेल तिकीट ?
किमान अंतरासाठी ( ५ किलोमीटर) प्रवाशांना ६ रुपये तिकीट असणार आहे.
एसी वातानुकूलित दुमजली बस लवकरच प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार…#ACBus #ACDoubleDeckerBus #एसीबस @myBESTBus pic.twitter.com/d0EEGROFUy
— Hindusthan Post Marathi (@HindusthanPostM) August 17, 2022
बसमार्ग
सुरूवातीच्या काळात बसेस पुढील तीन मार्गांवरून धावणार आहेत. यामध्ये टप्प्याटप्प्याने वाढ केली जाणार आहे.
- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते नरिमन पॉइंट
- कुलाबा ते वरळी
- कुर्ला ते सांताक्रुझ
नव्या बसची वैशिष्ट्य
- प्रत्येक नव्या बसमध्ये दोन जिने असतील, जुन्या बसमध्ये फक्त एकच जिना होता.
- नव्या बसमध्ये Digital तिकीटांची सोय असेल
- प्रवाशांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे लावले जातील.
- नवीन दुमजली बस भारत-६ श्रेणीतील असून या बसमध्ये स्वयंचलित गिअर आहे.
- बस थांब्याची माहिती देण्यासाठी बसमध्ये इलेक्ट्रॉनिक बोर्ड असतील.
- दोन स्वयंचलित दरवाजे असतील आणि ते उघडबंद करण्याचे नियंत्रण बसचालकाकडे असेल.
Join Our WhatsApp Community