मुंबईकरांना खुल्या बसमधून मिळणार ‘बेस्ट’ दर्शन!

171

अलिकडेच बेस्ट उपक्रमाने रात्रीच्या वेळी बससेवा सुरू करत मुंबईकरांना दिलासा दिला आहे. दरम्यान आता बेस्ट उपक्रमाने मुंबईकरांसोबत मायानगरीत येणाऱ्या पर्यटकांनाही आनंदाची बातमी दिली आहे. पर्यटनाला चालना देण्यासाठी बेस्ट प्रशासनाने कोरोनाच्या काळात बंद असलेली ओपन डेक बससेवा प्रशासनाने पुन्हा सुरू केली होती. पण, आता बेस्टच्या ताफ्यात आणखी तीन ओपन डेक डबल डेकर बसची भर पडली आहे.

( हेही वाचा : महाराष्ट्रातील ‘या’ शहरात ‘सीएनजी’ पेट्रोल-डिझेलपेक्षा महाग! )

संस्कृतीचे दर्शन

या बस पर्यटनाच्या उद्देशाने घेण्यात आल्या असून गेट वे ऑफ इंडिया ते जुहू किनारा अशी सैर यातून घडणार आहे. अनेक पर्यटकांनी व मुंबईकरांनी बुधवारी या मुक्त सफारीचा आनंद घेतला. नव्या रुपातील ट्राम सदृश्य खुल्या दुमजली बसचे औपचारिक उद्घाटन आणि लोकार्पण बेस्टचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्र यांच्या शुभहस्ते सायंकाळी कुलाबा आगारात पार पडले. सदर बस हेरिटेज सहलीसाठी खास प्रवाशांच्या आग्रहाखातर तयार करण्यात आली आहे. भविष्यात अशा आणखी बस प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहेत. असेही लोकेश चंद्र यांनी सांगितले.

ओपन डेक डबल डेकर बस

दक्षिण मुंबईतील महत्वपूर्ण ठिकाणांना भेट देण्यासाठी, मुंबईतील ऐतिहासिक वारसा संस्कृतीचे दर्शन करण्यासाठी बेस्ट प्रशासनाने ओपन डेक बसची निवड केली. याचे दर अपर डेकसाठी प्रती व्यक्ती १५० रुपये, तर लोअर डेक ७५ रुपये आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.